Baramati : गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लांखांचं बक्षीस? काय म्हणाले कामगार नेते?

एसटी (ST) कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची जीभ कापणाऱ्याला (Tongue cutting) 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी अशाप्रकारचे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

Baramati : गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लांखांचं बक्षीस? काय म्हणाले कामगार नेते?
कामगार संघटनेच्या मोर्चात सहभागी कामगार
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Apr 17, 2022 | 12:45 PM

बारामती, पुणे : एसटी (ST) कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची जीभ कापणाऱ्याला (Tongue cutting) 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी अशाप्रकारचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या हजारो महिलांनी आंदोलन केले. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी आठ एप्रिलला आंदोलनाच्या नावाखाली हल्ला करण्यात आला. त्यामुळे बारामतीच्या एमआयडीसी कंपनीतले कामगार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज बारामतीत आंदोलन केले.

महिलांनी केले ठिय्या आंदोलन

बारामती टेक्स्टाईल पार्कमधील सर्व महिलांनी एकत्र येत काळे झेंडे दाखवत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पवारांच्या बंगल्यावरील हल्ला हे षडयंत्र असल्याचे सांगत महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी शरद पवार यांच्या समर्थनार्थ महिलांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

रोख बक्षीस जाहीर

कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी यावेळी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्या व्यक्तीला अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला होता. याच्याच निषेधार्ध एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आठ एप्रिलला आंदोलन करण्यात आले होते. अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

आणखी वाचा :

Kirit Somaiya Toilet Scam : टॉयलेट घोटाळ्यात किरीट सोमय्या बॅकफुटवर? कारवाई आधी आमच्याशी संपर्क करा, सोमय्यांचं पत्रं

Pune crime : भर वस्तीतून तरुणीच्या हातातला मोबाइल हिसकावला; दुचाकीवरून चोरटे पसार, पाहा CCTV

Ajit Pawar On James Laine : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका; जेम्स लेन प्रकरणावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें