AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरुन जाता येणार सुसाट, दीड-दोन तासांचा प्रवास 20-25 मिनिटांवर

pune mumbai : पुणे-मुंबई रोज नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या लोकांना कधी वाहतूक कोंडी तर कधी सिग्नलवर थांबावे लागते. मात्र आता हा सर्व प्रवास सुसाट होणार आहे. यामुळे वेळ अन् इंधनाची बचत होणार आहे.

पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरुन जाता येणार सुसाट, दीड-दोन तासांचा प्रवास 20-25 मिनिटांवर
| Updated on: Jun 06, 2023 | 12:00 PM
Share

पुणे : मुंबई-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2025 पासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सिग्नलमुक्त करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) या दिशेने पावले उचलली आहेत. यामुळे इंधनाची मोठी बचत होणार आहे. तसेच वाहनचालकांच्या वेळेचीही बचत होणार आहे. सरकारने 1092 कोटी रुपये खर्चून यासाठी 4.5 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कॉरिडॉर शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील चिर्ले इंटरचेंज ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दरम्यान हा प्रकल्प होणार आहे.

कधी सुरु होणार काम

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून येत्या तीन महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील दोन सर्वोत्तम रस्त्यांना जोडणारा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे 4.5 किमी लांबीच्या कनेक्टरच्या बांधकामासाठी सुमारे 1092 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या टेंडरची प्रक्रिया जूनअखेरपासून करण्यात येणार आहे.

हा पूल सुरु होणार

मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी समुद्रावर 22 कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येत आहे. या मार्गावर सिग्नल असणार नाही. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर 15 ते 20 मिनिटांत कापता येणार आहे. पुलाचे काम जवळपास 94 टक्के पूर्ण झाले आहे. 2023 च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

प्रवासाचा वेळ वाचणार

चिर्ले येथे हा पूल पूर्णत्वास येत असल्याने वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. या समस्येवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने एमटीएचएलला थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी कनेक्टरद्वारे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.

एमटीएचएल आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामामुळे हा प्रवास 20 ते 25 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा मार्ग सुकर करण्यासाठी एमएमआरडीएने योजना तयार केली आहे. याअंतर्गत एमटीएचएलही थेट मुंबई-गोवा महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.