कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई दर्शनावर मर्यादा, भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच मंदिर खुलं

पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे साई दर्शनसाठी मंदिर संस्थानकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई दर्शनावर मर्यादा, भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच मंदिर खुलं
साई बाबा, शिर्डी

शिर्डी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शिर्डीतील साई मंदिर संस्थाननं काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. साई दर्शनसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही भाविक येत असतात. रोज हजारोंच्या संख्येनं भाविक साई बाबांचं दर्शन घेतात. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे साई दर्शनसाठी मंदिर संस्थानकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे साई दर्शनाला आता मर्यादा घालण्यात आली आहे.(New regulations of Sai Mandir Sansthan due to increasing corona)

साई संस्थानची नवी नियमावली

>> भाविकांना साई बाबांचं दर्शन आता सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत घेता येमार आहे.

>> पहाटेची काकड आरतीआणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना नो एन्ट्री

>> गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुट्टयांमध्ये ऑनलाईन पास घेणं बंधनकारक

>> ऑफलाईन पास काऊंटर गुरूवार, शनिवार, रविवार आणि सुट्टी दिवशी बंद राहणार

>> दिवसभरात 15 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार

>> दर्शन रांगेतील भक्तांपैकी 150 ते 200 भक्तांची दररोज कोरोना टेस्ट होणार

>> दर गुरूवारची साईपालखीही बंद

>> ऑनलाइन पास www.sai.org.in या वेबसाइटवरून घेण्याचं आवाहन

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पास कमी होण्याची शक्यता

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात राज्यभरातून भाविक येत आहेत. तुळजापुरात गेल्या 4 दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेता येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शानसाठीचे पास कमी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक व बालकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळ कमी होण्याची शक्यता

कोल्हापुरातील करवीर निवसिनी माता अंबाबाईच्या दर्शनाचीही वेळ कमी होण्याची शक्यता आहे. तसे संकेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले आहेत. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती कठोर निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दर्शनाची वेळ कमी करायची की नाही यावर आगामी दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

संबंधित बातम्या :

शिर्डीतील साई मंदिरात पत्रकारांसाठी जाचक अटी, संस्थान अधिकारी नेमकं काय लपवतायत?

शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचंय? आधी सोडतो म्हणत दाखवला बाहेरचा रस्ता, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यातील वाद चव्हाट्यावर

New regulations of Sai Mandir Sansthan due to increasing corona

Published On - 5:49 pm, Tue, 23 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI