गडकरींची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, 2215 कोटी रुपये प्रोजेक्टची घोषणा, 22 राजमार्गांची संपूर्ण माहिती

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रज येथे 2215 कोटी रुपयांच्या 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.

गडकरींची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, 2215 कोटी रुपये प्रोजेक्टची घोषणा, 22 राजमार्गांची संपूर्ण माहिती
नितीन गडकरी


पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रज येथे 2215 कोटी रुपयांच्या 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यातील या कामांचा विकास नहाय आणि महाराष्ट्र राज्याच्या पीडब्ल्यूडी यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. ईपीसी आणि बीओटी तत्त्वावर महामार्गांचा विकास करण्यात येणार आहे. पुण्याला मुंबई, रायगड, सातारा, सोलापूर, अहमदगर, नाशिक जोडणाऱ्या रस्त्यांचा याद्वारे विकास करण्यात येत आहे.

♦️ नहाय आणि पीडब्ल्यूडी महाराष्ट्र विभागाच्या वतीनं तायर करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 डी शिक्रापूर न्हावरा सेक्शनचं काम पूर्ण झालं आहे. 46.46 कोटी रुपयांच्या 28 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरकीरणाचं काम पूर्ण झालं आहे. शिक्रापूर आणि न्हावरा या दोन्ही क्षेत्रातील एमआयडीसी जोडल्या जातील आणि अहमदनगर आणि मराठवाड्याची कनेक्टविटी वाढणार आहे.

♦️ राष्ट्रीय महामार्ग 548 डी न्हावरा ते आंदळगाव या 48.45 कि.मी चं 311.86 मार्गाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे नाशिक आणि पुणे शहरातील वाहतूक सुकर होणार आहे.

♦️ राष्ट्रीय महामार्ग 548 डीच्या कात्रज जंक्शन वर 1.326 लांबीच्या 169 कोटींचा खर्च करुन उड्डाणपूल निर्माण करण्यात येणार आहे.ॉ

♦️ राष्ट्रीय महामार्ग 753 एफ बेल्हे शिरुर सेक्शनच्या चौपदरीकरणाचं आणि विकासाचं काम 27.03 कोटी रुपयांचा खर्च करुन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी 39 कि.मी आहे.

♦️ पुणे नाशिक शिर्डी ही तिन्ही शहर राष्ट्रीय महामार्ग 60 नं जोडला आहे. मंबई आग्रा आणि मुंबई बंगळुरु महामार्गाला हा जोडण्याचं काम करण्यात येत आहे. याचं महत्व लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग 60 च्या विकासकामाचं भूमिपूजन करण्यात येत आहे.

♦️ इंद्रायणी नदी ते खेड या विभागात 18 किलोमीटर च्या टप्प्याच्या विकासासाठी 1269 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चारपदरी महामार्गाचं सहापदरीकरण करण्यात येणार आहे. कृषी आणि पर्यटनाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

♦️ खेड घाट ते नारायणगाव रस्त्याची पूनर्रचना करण्यासाठी 285 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्प 9.32 कि.मी. रस्त्याचा विकास करणार आहे.

♦️ राष्ट्रीय महामार्ग 753 एफ सेक्शनवर पुणे ते शिरुर महामार्गाचा विकास करण्यात येणार आहे.

♦️ राष्ट्रीय महामार्ग 548 डी चाकण शिक्रापूर सेक्शनच्या चौपरीकरणाचं काम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. या महामार्गाच्या विकासामुळे पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक वेगवान होणार आहे. तळेगाव चाकण येथील एमआयडीसी जुन्या पुणे मुंबई महामार्गाला जोडली जाईल. या प्रकल्पासाठी 1015 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

♦️ राष्ट्रीय महामार्ग 965 डीडी शिंदेवाडी फाटा ते वरंधा या 59 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 310 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामुळे सोलापूर, सातारा रायगड दरम्यानची वाहतूक वाढेल आहे.

♦️ राष्ट्रीय महामार्ग 168 उंडवडी कडे पठार ते बारामती फलटण सेक्शनसाठी 365 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हा टप्पा 33.75 कि.मी आहे. यामुळे पुणे, सातारा आणि अहमदनगर जोडलं जाईल.
राष्ट्रीय महामार्ग 548 डीजी न्हावरा चौफुला सेक्शनच्या विकासासाठी 220 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची लांबी 25 किलोमीटर आहे. शिक्रापूर न्हावरा औद्योगिक क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. वरील पाच विकास प्रकल्पांचा खर्च 9443 कोटी रुपये आहे.

♦️ केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत येत्या काळात 17 रस्ते योजना सुरु होत आहेत. याची लांबी 116 किमी असून याचा खर्च 134 कोटी रुपये आहे.

इतर बातम्या:

मी फुकट काम करतो, 350 कोटी नव्हे, अवघ्या 1 कोटीत 1 किमी मेट्रो, नितीन गडकरींच्या 4 शहरांसाठी अफलातून संकल्पना

आयुष्यात माझी एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे : नितीन गडकरी

Nitin Gadkari laid Foundation stone Katraj Flyover and other 22 NH Projects in Pune of 2200 crore check details here

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI