AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर चक्क मेट्रो धावणार, गडकरींचा मेट्रोचा भन्नाट प्लॅन, केटरर्स, ट्रॅ्व्हल्स, बेरोजगारांना संधी मिळणार, वाचा सविस्तर

आजच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या.

पुणे ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर चक्क मेट्रो धावणार, गडकरींचा मेट्रोचा भन्नाट प्लॅन, केटरर्स, ट्रॅ्व्हल्स, बेरोजगारांना संधी मिळणार, वाचा सविस्तर
नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 5:01 PM
Share

पुणे : आजच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या. यावेळी पुणे शहरातून 4 शहरांत मेट्रो जाऊ शकतात आणि ते ही कमी खर्चात, असं स्वप्न बोलून दाखवताना गडकरींनी 4 शहरांसाठी अफलातून मेट्रो प्रकल्प सांगितला.

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

गडकरींची ब्रॉडगेज मेट्रोची भन्नाट संकल्पणा

गडकरींनी पुणे शहरातून 4 शहरांसाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पणा बोलून दाखवली. ते म्हणाले, नागपूर मेट्रोची निर्माण किंमत 350 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे तर पुणे मेट्रोची निर्माण किंमत 380 कोटी रुपये प्रति किलोमीटर , पण एक नवीन मेट्रोची संकल्पना आहे. ह्या मेट्रोची निर्माण किंमत फक्त एक कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी राहील. मी कन्सलटेन्ट म्हणून फुकट काम करायला तयार आहे

ही मेट्रो सध्याच्या ब्रॉडगेज रेलवे ट्रॅकवर धावेल आणि  यासाठी भारतीय रेल्वेसोबत मीटिंग सुद्धा झाली आहे. आम्ही हा प्रकल्प नागपूर परिसरात सुरु करणार आहोत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपण सुरु करु शकतो.

गडकरींनी 4 शहरांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं

पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापुर, पुणे ते अहमदनगर , पुणे ते सोलापुर अशी ही नवीन मेट्रो सुरु होउ शकते. या मेट्रोमध्ये 6 अत्याधुनिक कोच असतील आणि दोन कोच विमानासारखे असतील, असंही गडकरींनी सांगितलं.

नागपूर आणि पुणे मेट्रोवर गडकरी स्पष्ट बोलले

दुसरीकडे पुणे आणि नागपूर मेट्रोविषयी नेहमी तुलना होत असते. यावरही गडकरींनी भाष्य केलं. ते म्हणाले, “पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगाने सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं, यावरुन माझ्यावर आणि देंवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. पण खरं सांगतो पुणे मेट्रोच्या कामाबाबत जरा गुंतागुंत होती. अंडर ग्राऊंड मेट्रो करायची की वरुन जाणारी मेट्रो करायची, याबाबत एकमत होत नव्हतं. मात्र नागपूर मेट्रोबाबत, असं काही नव्हतं. त्याचमुळे नागपूर मेट्रोचं काम लवकर सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं”

नितीन गडकरी म्हणाले, “पुण्याच्या मेट्रोचं काम सुरु झालं नव्हतं आणि नागपूर मेट्रोचं काम वेगाने होत होतं. त्यावेळी मला आठवत पुण्यातल्या वर्तमान पत्रांनी माझ्यावर आणि देवेंद्रवर खुप टीका केली होती. त्यावेळी मी पुण्यात आलो होतो, त्यावेळी पवार साहेबांबरोबर एक मिटिंग झाली. त्यावेळी मी ठरवलं की जेवढा आपण खर्च जास्त करु, तेवढा तिकीटाचा दर जास्त होईल. त्यामुळे जेवढं अंडरग्राऊंड टनेलिंग जास्त करु, तेवढा खर्च वाढणार आहे. त्याचवेळी आम्ही पुणे मेट्रोच्या कामाची दिशा ठरवली आणि पुणे मेट्रोचं काम सुरु झालं. आज आनंद वाटतो, पुण्यामध्ये मेट्रोचं काम अतिशय गतीने सुरु झालं आहे”.

(Union Minister Gadkari concept of Broad Gauge Metro for 4 cities from Pune)

हे ही वाचा :

पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगवान कसं? फडणवीसांसोबत खरंच चाल खेळली का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द

वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांचे, तर अ‍ॅम्ब्युलन्सवर आकाशवाणीची धून, प्रदूषणावर गडकरींचा भन्नाट पर्याय

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.