पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगवान कसं? फडणवीसांसोबत खरंच चाल खेळली का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगाने सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं, यावरुन माझ्यावर आणि देंवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. पण खरं सांगतो पुणे मेट्रोच्या कामाबाबत जरा गुंतागुंत होती, असं नितीन गडकरी म्हणाले.

पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगवान कसं? फडणवीसांसोबत खरंच चाल खेळली का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री


पुणे :  “पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगाने सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं, यावरुन माझ्यावर आणि देंवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. पण खरं सांगतो पुणे मेट्रोच्या कामाबाबत जरा गुंतागुंत होती. अंडर ग्राऊंड मेट्रो करायची की वरुन जाणारी मेट्रो करायची, याबाबत एकमत होत नव्हतं. मात्र नागपूर मेट्रोबाबत, असं काही नव्हतं. त्याचमुळे नागपूर मेट्रोचं काम लवकर सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

पुणे-नागपूर मेट्रोबाबत गडकरी काय म्हणाले?

नितीन गडकरी म्हणाले, “पुण्याच्या मेट्रोचं काम सुरु झालं नव्हतं आणि नागपूर मेट्रोचं काम वेगाने होत होतं. त्यावेळी मला आठवत पुण्यातल्या वर्तमान पत्रांनी माझ्यावर आणि देवेंद्रवर खुप टीका केली होती. त्यावेळी मी पुण्यात आलो होतो, त्यावेळी पवार साहेबांबरोबर एक मिटिंग झाली. त्यावेळी मी ठरवलं की जेवढा आपण खर्च जास्त करु, तेवढा तिकीटाचा दर जास्त होईल. त्यामुळे जेवढं अंडरग्राऊंड टनेलिंग जास्त करु, तेवढा खर्च वाढणार आहे. त्याचवेळी आम्ही पुणे मेट्रोच्या कामाची दिशा ठरवली आणि पुणे मेट्रोचं काम सुरु झालं. आज आनंद वाटतो, पुण्यामध्ये मेट्रोचं काम अतिशय गतीने सुरु झालं आहे”.

जुन्या पुण्याच्या आठवणी जागवताना गडकरींना सगळ्यात मोठी खंत!

यावेळी केलेल्या भाषणात गडकरींनी जुन्या पुण्याच्या आठवणी जागवल्या. गडकरी म्हणाले, “मला आज पुण्यात येताना  दु:ख होतं, 30-40 वर्षांपूर्वी पुण्यातील हवा शुद्ध होती. माझी बहीण पुण्याची आहे. आम्ही जुन्या काळी तिच्याकडे यायचो. स्वारगेटजवळ बहिण राहत होती. पर्वतीवर जाऊन खायचं, मजा करायची. पण आताचे पुणे प्रदूषित झालं आहे. प्रदूषणाबाबत पुण्याचा खूप वरचा क्रमांक आहे. अजितदादा, महापौर मोहोळ आणि पुण्याचे विविध लोकप्रतिनिधींनी प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घ्या, असं आवाहन गडकरींनी केलं.

ध्वनी प्रदूषणावर गडकरींचा जालीम उपाय

जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करुन, प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे की जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं, अशा प्रकारचा भन्नाट उपाय गडकरींनी ध्वनीप्रदूषणावर सुचवला.

हे ही वाचा :

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द

वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांचे, तर अ‍ॅम्ब्युलन्सवर आकाशवाणीची धून, प्रदूषणावर गडकरींचा भन्नाट पर्याय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI