आधी महापालिकेची कर थकबाकीची नोटीस, नंतर केंद्राचा पद्मश्री, पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वाद

गिरीश प्रभुणे यांना 21 जानेवारीला पिंपरी महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासंबंधीची नोटीस पाठलीय. | Notice of PCMC To Girish Prabhune Over tax before Centre Govt Padma Shri

आधी महापालिकेची कर थकबाकीची नोटीस, नंतर केंद्राचा पद्मश्री, पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वाद
girish prabhune

पुणे : नुकत्याच केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने (Padma Award)  सन्मानित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे (Girish Prabhune) यांना पिंपरी चिंडवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम (Punrutthan Samarasata Gurukulam) या त्यांच्या संस्थेला महापालिकेची मालमत्ता कर भरण्यासंबंधी नोटीस आली आहे. (Notice of PCMC To Girish Prabhune Over tax before Centre Govt Padma Shri)

रुपये 1 कोटी 83 लाख मालमत्ता कर भरण्याची ही नोटीस आहे. 21 जानेवारीला महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर 25 जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता. 1 लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या सगळ्यांनाच ही नोटीस पाठवण्यात आली होती, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती.

नोटीसीवरुन आशिष शेलारांनी महापालिका आयुक्तांना झापले

महापालिकेच्या आयुक्ताचं डोकं ठिकाणावर आहे का? या प्रशासकिय बाबींमध्ये ज्या पद्धतीने बील काढली जातात आणि पाठवली जातात हे काही सत्तेत बसलेल्या महापौरांच्या निदर्शनास आणून काढली जात नाही. पण आयुक्तांनी प्रशासकिय काम करताना डोकं ठिकाणावर ठेऊ काम केलं पाहिजे. आमची मागणी आहे की पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांवर कारवाई करा आणि महापौरांना माझं निवेदन असेल की प्रभुणे यांना पाठवलेल्या बिलावर स्थगिती द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

गिरीश प्रभुणे यांची ओळख…

गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यातही पारधी समाजातील मुलींना शिक्षण मिळावं, पारधी समाजाचं पुनर्वसन व्हावं यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ही संस्था कार्यरत आहे. पारधी समाजाच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. या गुरुकुलमध्ये पारधी समाजातील 200 मुले आणि 150 मुली शिकत आहेत. प्रभुणे यांनी 1970 पासून पारधी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.

(Notice of PCMC To Girish Prabhune Over tax before Centre Govt Padma Shri)

हे ही वाचा :

ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?

Published On - 12:42 pm, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI