AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; मनसेकडूनही वकिलांची फौज तयार

राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं आहे.   कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस पाठवली आहे. असून अनेकांना पोलीस ठाणे हद्दीत येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे

राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; मनसेकडूनही वकिलांची फौज तयार
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 03, 2022 | 12:31 PM
Share

पुणे – राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना रमजान आणि अक्षय तृतीया सणात कुठली बाधा येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मनसेनंही(MNS) राज्यभरात वकिलांची फौज तयार केली आहे. पुण्यातील मनसे नेते किशोर शिंदेंच्या(Kishora shinde ) नेतृत्वात वकिलांची फौज तयार केली आहे. मुंबई आणि पुण्यातील वकिलांची यादी तयार असल्याची माहिती टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. मनसे कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या तर वकिल मदत करणार.  मनसेनं तयारी सुरू केल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. मनसेनंतर भाजप (BJP)कार्यकर्त्यांनाही पेलिसांकडून 143(3) अन्वये पोलिसांनी पाठवल्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत हनुमान चालिसा लावण्यासाठी राज ठाकरे आक्रमक झाल्याने भाजपचे नेतेही यात सहभाग घेऊ शकतात या अर्थी खबरदारीचा ऊपाय म्हणून कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस पाठवली

राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं आहे.   कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस पाठवली आहे. असून अनेकांना पोलीस ठाणे हद्दीत येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेकांना तडीपार करण्यात आले असून या मनसे कार्यकर्त्यांच्या हालचाली वरती हि पोलिस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे…

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका

मनसे राज ठाकरे यांच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आजची महाआरती रद्द करण्यात आली असली तरी भोगांच्या अल्टिमेटम वर मनसे ठाम असून आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. उद्या मनसेची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दहा वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये नेमक काय ठरणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...