AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Maharashtra Update : महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, पुण्यासह पिंपरीतील 4 ओमिक्रॉनच्या रुग्णांसंदर्भात महत्त्वाची अपडेट

आता दिलासा देणारी बातमी समोर आली असून डोंबिवलीतील युवक ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्गातून मुक्त झाल्यानंतर पुण्यातील एक आणि पिंपरी चिंचवडमधील 4 जण बरे झाले आहेत.

Omicron Maharashtra Update : महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, पुण्यासह पिंपरीतील 4 ओमिक्रॉनच्या रुग्णांसंदर्भात महत्त्वाची अपडेट
ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 1:32 PM
Share

पुणे: महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचे 10 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्कता बाळगण्यात येत होती. 10 रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलं होतं. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली असून डोंबिवलीतील युवक ओमिक्रॉन वेरिएंटच्या संसर्गातून मुक्त झाल्यानंतर पुण्यातील एक आणि पिंपरी चिंचवडमधील 4 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आता ओमिक्रॉनचे चार सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यातील रुग्णाला 10 दिवसानंतर डिस्चार्ज

पुण्यात फिनलंडवरून आलेल्या रुग्णाची ओमिक्रॉन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 29 नोव्हेंबरला त्याला ताप आल्यावर त्याची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर चाचणी केली असता तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. अखेर निगेटिव्ह आल्यानंतर 10 दिवसानंतर आज त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.3

पिंपरी चिंचवडमधील 4 जण ओमिक्रॉन मुक्त

पिंपरी चिंचवडमधील सहा जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाला होता. त्यापैकी चार ओमिक्रॉन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्रात चार सक्रिय रुग्ण

राज्यात ओमिक्रॉन ससंर्गाचे 10 रुग्ण आढळले होते. कल्याण डोंबिवलीत 1, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात एक आणि मुंबईत 2 असे महाराष्ट्रात एकूण 10 रुग्ण आढळले होते. त्यापैकी कल्याण डोंबिवलीतील रुग्ण कालच बरा झाला होता. आज पुण्यातील एका रुग्ण आणि पिंपरी चिंचवडमधील चार रुग्ण ओमिक्रॉनमधून मुक्त झाल्यानं राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात सद्या मुंबईतील दोन आणि पिंपरीतील 2 असे चार सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात बोलत असताना पिंपरी चिंचवडमधील ओमिक्रॉनचे चार रुग्ण बरे झाले आहेत.

इतर बातम्या:

Gopichand Padalkar | आरोग्य विभाग घोटाळ्याची चौकशी आरोग्य मंत्र्यांसहीत झाली पाहिजे: गोपीचंद पडळकर

School Reopen: औरंगाबादमधील शाळांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला ठरणार!

Omicron Maharashtra Update four patients in Pimpari and one patient from Pune recover from omicron

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.