AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिमला मिर्ची पिकवणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास! स्थापनेपासून पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध

सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावानं 45 वर्षानंतर ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करुन इतिहास घडवला आहे. (Padsali Gram Panchayat Election)

सिमला मिर्ची पिकवणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास! स्थापनेपासून पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध
पडसाळी ग्रामस्थ
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:55 PM
Share

सोलापूर: जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील अगदी टोकाला असलेल्या पडसाळी गावानं इतिहास घडवला आहे. पडसाळी (Padsali) दुष्काळग्रस्त गाव असूनही त्यांनी सिमला मिर्चीच्या उत्पादनासाठी ओळख निर्माण केली आहे. सोलापूर मध्ये सध्या 687 गावांमधील ग्रामपंचायत निवडणुकांची (Gram Panchayat Election) प्रक्रिया सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात 70 ग्रामपचायंतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. (Padsali Village of make unopposed Gram Panchayat Election)

मातीतून मोती पिकवणारे हात गावासाठी एकत्र

दुष्काळग्रस्त असूनही पडसाळी गावानं एकीचं दर्शन घडवले. कष्टाच्या जोरावर सिमला मिर्ची म्हणजेच ‘ढोबळी मिर्चीचे अगार’ अशी ओळख पडसाळी गावानं निर्माण केली. शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येत गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. पडसाळीमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच बिनविरोध निवडणूक झाली. यामुळे सोलापूर जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वीज प्रश्न सोडवण्याचा निर्धार

पडसाळी गाव सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्याच्या उत्तर टोकाला आहे. या गावाला वीज समस्या सारखी भेडसावत असते. यासमस्येला आणि निवडणुकीतून निर्माण होणाऱ्या वादांना टाळण्यासाठी पडसाळी गावानं ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त समजलं जाणार पडसाळी गाव सध्या जिल्ह्यातील ‘ढोबळी मिर्ची’चं अगार म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्याच गावाच्या शिरपेचात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावकऱ्यांनी मानाचा तुरा रोवला आहे.

45 वर्षांची परंपरा खंडित, मळेगाव ( Malegaon) ग्रामपंचायतीचे अखेर बिगुल वाजले

बार्शी तालुक्यातील मळेगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते ते इथल्या बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीच्या परंपरेमुळे, गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होत होती. गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे गावात अनेक विकास कामे झाली आहेत. गावकऱ्यांच्या प्रयत्नातूनच दोन वर्षापूर्वी मळेगाव ग्रामपंचायतीला राज्य सरकारचा जलयुक्त शिवार अभियानाचा प्रथम क्रमांक मिळाला होता. यंदा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर यंदाही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावकर्यांनी प्रयत्न केले. मात्र, गावकऱ्याच्या प्रयत्नाला यश आले नाही, त्यामुळे 45 वर्षानंतर प्रथमच गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. नऊ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या मालेगाव ग्रामपंचायतीसाठी नऊ विरुद्ध नऊ असे अर्ज आले आहेत, त्यामुळे निवडणूक लागली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात एकूण 658 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. तर,नरखेड, शेटफळ, वडाळा,लांबोटी, पाटकूल,करकंब ,जेऊर,झरे,मांगी, या ग्रामंपचायतीमध्ये चुरशीच्या लढती होणार असल्याचे चित्र आहे. तर, वडवळ, पाथरी, वाघोली,निमगाव,कुरभावी,पडसाळी, गोरडवाडी, बाभूळगाव, जेऊरवाडी,मालवंडी,खातगाव,अनगर, शिरापूर, पीर टाकळी, सिद्धेवाडी,आढेगाव,पासलेवाडी,बिटले,रामहिंगणी,मनगोळी यासह एकूण 70 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

संबंधित बातम्या:

राळेगणसिद्धी, हिवरे बाजारच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित; अण्णा, पोपटराव पवारांच्या वर्चस्वाला धक्का?

70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

(Padsali Village of make unopposed Gram Panchayat Election)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.