VIDEO: बालगंधर्वमध्ये शरद पवारांची ‘चित्तर’कथा…; चित्रप्रदर्शनाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद!

महाविद्यालयीन जीवनात मित्रांच्या गोतावळ्यात रमलेले शरद पवार... दिलखुलास हसणारे पवार... फोनवरून संवाद साधणारे पवार... मोर्चा... रॅलीतून संबोधित करणारे पवार अन् जमिनीवर बसून पाटावर ताट ठेवून अन्न ग्रहण करणारे पवार...

VIDEO: बालगंधर्वमध्ये शरद पवारांची 'चित्तर'कथा...; चित्रप्रदर्शनाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद!
sharad pawar
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 12:18 AM

पुणे: महाविद्यालयीन जीवनात मित्रांच्या गोतावळ्यात रमलेले शरद पवार… दिलखुलास हसणारे पवार… फोनवरून संवाद साधणारे पवार… मोर्चा… रॅलीतून संबोधित करणारे पवार अन् जमिनीवर बसून पाटावर ताट ठेवून अन्न ग्रहण करणारे पवार… पवारांची ही विविध रुपं पाहायची असेल, पवारांना, त्यांच्या कार्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला बालगंधर्व रंगमंदिरात यावचं लागेल… राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बालगंधर्वमध्ये पवारांच्या आयुष्याची चित्तरकथा मांडणारे प्रदर्शन भरले आहे. त्यात पवारांची अत्यंत दुर्मिळ फोटो लावण्यात आले आहेत.

sharad pawar

sharad pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार यांचा सहभाग असणारा “चित्र-शिल्प संवाद” हा एक आगळा वेगळा बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू आहे. यामध्ये देशातील नामवंत चित्रकार, शिल्पकार सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे छायाचित्र प्रदर्शन देखील इथं भरवण्यात आलं आहे.

sharad pawar

sharad pawar

पवारांच्या आयुष्यातील विविध पैलूंचं प्रदर्शन भरवलं आहे. या प्रदर्शनात पवारांच्या महाविद्यालयीन जीवनापर्यंतची फोटो लावण्यात आली आहेत. मोर्चा, रॅली, सभा समारंभ, महाविद्यालयात मित्रांच्या गोतावळ्यात, शेतीची पाहणी, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, कुटुंबासोबतचे पवार आदी पवारांचे विविध पैलू उलगडणारे फोटो या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. पवारांचा संघर्ष आणि उत्तुंग व्यक्तीमत्त्वच या चित्रप्रदर्शनातून उलगडण्यात आलं आहे. आलेल्या लोकांची चित्रं काढत आहेत. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच भरल्या गेलेल्या या सार्वजनिक उपक्रमाला पुणेकरांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे.

sharad pawar

sharad pawar

पवारांनी कलाकारांना राजाश्रय दिला

राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांना खूप काही गमवावं लागलं. त्यांची मानसिकताही खूप खराब झाली होती. त्यांना आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे. चित्रकार आणि शिल्पकारांना एकत्रं आणलं. वासूदेव कामत काल आले होते. त्यांनी चित्रकारांना मार्गदर्शन केलं. भविष्यातील चित्रकारांना मोठं मार्गदर्शन मिळालं. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात कलाकारांना राजाश्रय मिळायचा. तोच राजाश्रय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनात कलाकारांना दिला, असं आयोजकांनी सांगितलं.

sharad pawar

sharad pawar

मोठी प्लॅटफॉर्म मिळाला

कालपासून मी या चित्रप्रदर्शनात आलो आहे. जे सर्व वातावरण चैतन्यमय आहे. कलेच्या बाबतीत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये चेतना निर्माण झाली आहे. लॉकडाऊन मुळे जीवन थांबलं होतं आता साधारण दिवाळीनंतर रुटीनमध्ये आलो आहोत. सर्व संपलं असं नाही. पण पुण्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रांचं प्रर्दशन होत आहे. कलावंतांसाठी चैतन्य निर्माण झालं आहे, अशी भावना चित्रकारांनी व्यक्त केली. तर या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, अशी भावना काही चित्रकारांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

AIMIM Rally: राहुल गांधी मुंबईत येणार आहेत, तेव्हा 144 कलम लावणार का?; ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल

VIDEO: नवाब मलिकांच्या घरी ‘पाहुणे’ येणार का? पाहुण्यांनी मला सांगावं, मीच ईडीमध्ये येईल: मलिक

AIMIM Rally: मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं मुसलमानांना आवाहन

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.