Pune : पंचायत राज प्रणालीमुळे गावांचा विकास शक्य झाला; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे प्रतिपादन

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) 'मागील 60 वर्षांचा मागोबा' या पुस्तिकेचे प्रकाशन आणि विविध पुरस्कार वितरण करण्यात आले.

Pune : पंचायत राज प्रणालीमुळे गावांचा विकास शक्य झाला; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे प्रतिपादन
Image Credit source: tv9
अजय देशपांडे

|

Aug 15, 2022 | 2:03 PM

पुणे : आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) ‘मागील 60 वर्षांचा मागोबा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी पंचायत राज प्रणालीची ग्रामीण विकासात असलेली भूमिका स्पष्ट केली. पंचायत राज प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना अधिक शक्ती देण्याचे कार्य केंद्र सरकारने (Central Govt) केल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.केंद्राच्या नव्या धोरणांमुळे आता गावासाठी असणार निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत असल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. सोबतच या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट होत असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.

तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार कमी झाला

पुढे बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे की, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. भारताने आजपासून 25 वर्षांपूर्वी डिजीट युगाचे स्वप्न पाहिले होते. ते आज साकार होताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून त्याच्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डिजिटलायझेशनमुळे सर्वसामान्य माणसांना देखील आता लोकशाहीच्या प्रक्रियेत सहज सहभागी होणे शक्य झाले आहे. सोबतच भ्रष्टाचाराला देखील मोठा आळा बसला आहे. आता गावाच्या विकासासाठी जो निधी देण्यात येतो तो थेट ग्रामपंचायतींना मिळतो, त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उरत नसल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

कर्तव्य पालनाचे सूत्र स्विकारण्याची गरज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे की, पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. पुणे ही लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आहे. पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांनी समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्या विचाराचा वारसा पुण्याला लाभला आहे. शिक्षणाचे माहेरघर अशी या शहराची ओळख आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. आपण कर्तव्य पालनाचे सूत्र स्विकारले तरच आपला जिल्हा, राज्य आणि देश प्रगतीपथावर जाऊ शकतो असे राज्यपालांनी यावेळी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें