ऑनलाईन नोंदणीशिवाय भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

ऑनलाईन नोंदणीशिवाय भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय
विठ्ठल रखुमाई मंदिर, पंढरपूर

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना ऑनलाईन नोंदणी न करताही दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीनं हा निर्णय घेतला आहे. Pandharpur Vitthal Rukmini Temple

Yuvraj Jadhav

|

Jan 11, 2021 | 7:28 PM

सोलापूर: पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं (Vitthal Rukmini) दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ऑनलाईन पास न काढता ही विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन सुविधा रद्द करून कोरोनाचे सर्व नियम पाळून 20 जानेवारी पासून दर्शन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मात्र 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षा खालील लहान मुलांना मात्र प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये हा महत्वपूर्ण घेण्यात आला. (Pandharpur Vitthal Rukmini Temple committee take decision of cancel online registration process)

कोरोना काळात विठ्ठल मंदिर नऊ महिने बंद होते. त्यानंतर दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन मुख दर्शन सुरू करण्यात आले होते. दररोज 5 हजार भाविकांना दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. आता त्यामध्ये वाढ करून 8 हजार भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आली आहे. संक्रांतीच्या दिवशी पंढरपूर शहरातील महिलांसाठी सायंकाळी 4 पासून रुक्मिणी मातेच्या दर्शानाची विशेष सोय करण्यात आली आहे. परंतु, मंदिरात व परिसरात वाणवसा देण्यास निर्बंध घालण्यात आले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले.

ऑनलाईन बुकिंगला थंड प्रतिसाद

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आले आहे. मात्र, भाविकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याचं चित्रं आहे. यापूर्वी एका दिवसात 4800 भाविकांना दर्शनास सोडले जात होते. पण तीन हजारांच्या आसपासच भाविक ऑनलाईन बुकींग करत होते. त्यातही अनेक जण येत नसल्याचे चित्र होते.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर 

ऑनलाईन बुकींग न करता सुध्दा अनेक भाविक पंढरपुरात येत आहेत. पंढरपुरात आल्यानंतर त्यांना पास बाबत माहिती समजते. पण पास नसल्याने त्यांना दर्शन रांगेत प्रवेश मिळत नाही. दिवसभरात 4800 भाविकांना दर्शनास परवानगी असली तरी दररोज फक्त नियम पाळून हजार दीड हजारच भाविक दर्शन घेतात.त्यामुळे दर्शन रांग रिकामीच राहते. पास नसलेल्या भाविकांनी नियम पाळत आपल्याला ही दर्शनास सोडावे अशी मागणी केली होती. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या निर्णयाचा भाविकांना फायदा होणार आहे.

पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शनासाठी एक नियमावली तयार केली होती. कोरोनाचे नियम पाळत दर दिवशी 4800 भाविकांना दर्शनास सोडले जायचे आता ही संख्या 8 हजार भाविकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात 1 आणि 9 तारीख वगळता इतर दिवशी फक्त तीन हजारच्या आसपास भाविकांनी ऑनलाईन बुकींग केले. त्यातही अनेक भाविक दर्शनास आलेच नाहीत, अशी माहिती विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

संबंधित बातम्या:

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

Temple Reopen | राज्यातील मंदिरं उघडण्यासंर्दभातील नियमावली

(Pandharpur Vitthal Rukmini Temple committee take decision of cancel online registration process)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें