अंध महिलेला एक दिवसाच्या पोलीस आयुक्ताचा मान, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा

अंध महिलेला एक दिवसाच्या पोलीस आयुक्ताचा मान, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा
पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार अंध महिलेकडे

प्रजासत्ताकदिनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चक्क आपल्या पदाचा कार्यभार हा एका अंध महिलेला दिला.

Nupur Chilkulwar

|

Jan 27, 2021 | 1:06 PM

पिंपरी : सिने सृष्टीमध्ये एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला नायक चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेलच (Pimpari-Chinchwad One Day Police). अभिनेता अनिल कपूर हा या चित्रपटामध्ये एक दिवसासाठी राज्याचा मुख्यमंत्री होतो. मात्र, याच सारखं एक दिवसाचा पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त बनण्याचं स्वप्न अंध, विधवा आणि झोपडपट्टी मधील युवकांचं पूर्ण झाले आहे. प्रजासत्ताकदिनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हे घडलं आहे (Pimpari-Chinchwad One Day Police).

पिंपरी-चिंचवडमध्ये अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चक्क आपल्या पदाचा कार्यभार हा एका अंध महिलेला दिला. तर सहपोलीस आयुक्तपदी विधवा महिला आणि पोलीस उपायुक्त होण्याचा मान हा झोपडपट्टी मधील एका विद्यार्थ्यांला दिला. यामध्ये पोलीस आयुक्त पदी दृष्टीहीन रीना पाटील, सहपोलीस आयुक्तपदी विधवा महिला ज्योती पाटील, तर दिव्यांशु तामचीकर हा विद्यार्थी पोलीस उपायुक्त गुन्हे या पदावर नियुक्त झालेत.

आता या सर्वाचा बडदास्त ही खऱ्याखुऱ्या पोलिसांप्रमाणे ठेवण्यात आली. ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यलयात येत असतात, त्यावेळी त्यांना सॅल्युट केलं जातं. त्याच पद्धतीने या एक दिवसाच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा देण्यात आलं. तर, पोलीस दलातील बँड पथकानेही सलामी दिली. त्यानंतर तिघेही कार्यालयात दाखल झाले, त्यावेळी त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानी विराजमान करत कडक सॅल्युट ठोकून दैनंदिन कार्याला सुरवात केली. हा सर्व प्रकार पाहून हे तिघेही भारावून गेले. त्यांच्यासाठी हा क्षण आनंदाचा होता.

“या क्षणाचा स्वप्नातही विचार केला नव्हता, आम्ही पूर्णतः अंध असल्याने फक्त पोलिसांबद्दल ऐकू शकतो. मात्र, जे ऐकलं ते खरं निघालं. पोलीस खरंच सामान्य माणसाचे मित्र असतात आणि आज या पदाची सूत्रे स्वीकारल्यावर एक नक्की सांगावसं वाटते, कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच महिला सुरक्षित राहतील”, असं रीना पाटील म्हणाल्या.

“कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिनेही पोलिसांची मदत घ्यावी. ते आपल्यासाठीच असतात. पतीचं निधन झाल्या नंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. तरुण मुलीचा सांभाळही करायचा होता, अशा परिस्थितीत फक्त पोलिसांनी जगण्याच बळ वाढवलं. आज जेव्हा हा सन्मान स्वीकारला, तेव्हा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली”, अशी भावना ज्योती माने यांनी व्यक्त केली

“आज इथे एक दिवसाचा पोलीस म्हणून दाखल झालो असलो, तरी भविष्यात खूप मेहनत करुन मी खराखुरा पोलीस अधिकारी म्हणूनच पोलीस मुख्यालयात दाखल होणार, मला आमच्या समाजाची मानसिकता बदलायची आहे”, असे मत दिव्यांशु तामचिकर या विद्यार्थ्यांने मांडले.

Pimpari-Chinchwad One Day Police

संबंधित बातम्या :

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी दिवसभरासाठी सृष्टी गोस्वामी, वाचा ‘नायक’ची खरीखुरी स्टोरी

सृष्टी गोस्वामी होणार उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री; विधानसभेलाही संबोधित करणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें