AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराच्या वाढदिवशी फॅशन शो, पिंपरीच्या महापौरांच्या मुलावर गुन्हा

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरांच्या मुलाकडून मिस अँड मिसेस फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. (Pimpri Chinchwad Mayor son FIR)

भाजप आमदाराच्या वाढदिवशी फॅशन शो, पिंपरीच्या महापौरांच्या मुलावर गुन्हा
पिंपरी चिंचवड महापौर माई उर्फ उषा ढोरे
| Updated on: Feb 25, 2021 | 9:31 AM
Share

पिंपरी चिंचवड : फॅशन शोमध्ये कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहर मनोहर ढोरे यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Mayor Mai Usha Dhore son Jawahar Dhore FIR for Ms and Mrs Fashion Show)

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये मिस अँड मिसेस फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये कोरोनासंबंधी सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तरीही शहरात मिस अँड मिसेस फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकेनेही हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासण्यात आला.

महापौरांसह नगरसेविकांचा विनामास्क रॅम्पवॉक

कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक प्रेक्षकांनी तोंडाला मास्कही लावला नव्हता. तसेच यावेळी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. यावेळी महापौरांसह बहुतांश नगरसेविकांनी विनामास्क रॅम्पवॉक केलं. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेही उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र सभागृहाच्या पन्नास टक्के उपस्थिती ठेवणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहे. मात्र महापौर आणि नगरसेवकांकडूनच नियमांची पायमल्ली केली जात आहे. (Pimpri Chinchwad Mayor Mai Usha Dhore son Jawahar Dhore FIR for Ms and Mrs Fashion Show)

जवाहर ढोरेंविरोधात गुन्हा

या प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या मुलावर चिंचवड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहर मनोहर ढोरे यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नाईट कर्फ्यू

पिंपरी-चिंचवड शहरात 22 फेब्रुवारीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. यावेळी काही नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

भाजप आमदाराच्या वाढदिवसानिमित्त फॅशन शोचे आयोजन, महापौरांसह नगरसेविकांचे विनामास्क रॅम्पवॉक

(Pimpri Chinchwad Mayor Mai Usha Dhore son Jawahar Dhore FIR for Ms and Mrs Fashion Show)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.