कोरोना लस न घेतल्यास वेतन स्थगिती? पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचाऱ्यांना इशारा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नाही, तर त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं परिपत्रकाद्वारे महापालिका आयुक्तांनी सूचित केलं आहे.

कोरोना लस न घेतल्यास वेतन स्थगिती? पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचाऱ्यांना इशारा
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:40 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकते. त्या संबंधीचे परिपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. किमान 20 जुलैपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Municipal Commissioner warns salary cut of employees who did not take Corona Vaccine)

20 जुलैपर्यंत लस घेण्याची सूचना

सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी, अशी जनजागृती प्रशासन करत आहे. अशात महापालिकेचे कर्मचारी लसीअभावी मागे राहू नयेत, म्हणून थेट वेतन स्थगित करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी सूचित केलं आहे.

कोणाकोणाला पालिका आयुक्तांचे आदेश?

पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 7 हजार 479 कर्मचारी आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदार पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही ही लस घेतलेली नाही.

सोलापुरात दुकानदारांनाही लसीकरण बंधनकारक

दुसरीकडे, सोलापूर शहरातील दुकानदारांनाही आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सोलापूरचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी त्यासंबंधी आदेश काढले आहेत. लसीकरण प्रमाणपत्र दुकानात ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

सोलापूर शहरातील दुकानदार, कारखानदार, उद्योजक यांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी कोरोना चाचणी आणि लसीकरणाचे प्रमाणपत्र दुकानात ठेवणे बंधनकारक असेल. महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी केलेल्या छापील आयसीएमआर क्रमांक असलेला वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणेही आवश्यक आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना रोखण्यासाठी लस प्रभावी, मुंबईत दोन डोस घेतलेले फक्त 26 जण बाधित

कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील 315 दिवसांचं अंतर अधिक प्रभावी, तिसऱ्या डोसने ‘इम्युनिटी’ आणखी वाढणार

(Pimpri Chinchwad Municipal Commissioner warns salary cut of employees who did not take Corona Vaccine)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.