कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील 315 दिवसांचं अंतर अधिक प्रभावी, तिसऱ्या डोसने ‘इम्युनिटी’ आणखी वाढणार

कोव्हिशील्डच्या (Covishield vaccine) दोन डोसमधील अंतर 45 आठवडे म्हणजेच जवळपास 315 दिवसांचं अंतर हे अधिक प्रभावी असल्याचा दावा, संशोधकांनी केला आहे.

कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील 315 दिवसांचं अंतर अधिक प्रभावी, तिसऱ्या डोसने 'इम्युनिटी' आणखी वाढणार
कोविशिल्ड लस

नवी दिल्ली : कोरोनावरील कोव्हिशील्ड लसीबाबत महत्त्वाची माहिती अभ्यासकांनी समोर आणली आहे. कोव्हिशील्डच्या (Covishield vaccine) दोन डोसमधील अंतर 45 आठवडे म्हणजेच जवळपास 315 दिवसांचं अंतर हे अधिक प्रभावी असल्याचा दावा, संशोधकांनी केला आहे. ऑक्सफोर्डच्या नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या डोसमुळे शरिरातील अँटिबॉडीचा स्तर आणखी वाढत असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.(AstraZeneca Covishield vaccine 315 days gap between two dose more effective new study)

म्हणजे दोन डोस दिल्यानंतर 6 महिन्यांच्या अंतराने जर तिसरा बुस्टर डोस दिला तर कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटविरुद्ध अधिक चांगला प्रतिसाद मानवी शरिराकडून मिळतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन चाचणीचे मुख्य अभ्यासक प्राध्यापक अँड्र्यू पोलार्ड यांनी याबाबतची अधिक माहिती दिली. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, एस्ट्रेजेनेका-ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन अर्थात कोव्हिशील्ड लसीचा आणखी एक डोस देऊन, शरिराचा कोरनाविरोधी प्रतिसाद वाढवता येऊ शकतो. दोन डोसमुळे प्रतिकार शक्तीचा अवधी आणि व्हेरिएंटविरुद्ध संरक्षण याबाबत बूस्टर डोसची मदत मिळते का याबाबतचा पुढचा अजूनही सुरु आहे, असं पोलार्ड यांनी सांगितलं.

दुसऱ्या डोसनंतर 18 टक्के अँटीबॉडी वाढल्या  

या संशोधनानुसार, पहिल्या डोसनंतर शरिरातील अँटीबॉडीचं प्रमाण एक वर्षानंतर काही प्रमाणात राहिल्या. तसं 28 दिवसानंतर अँटीबॉडी प्रमाण होतं ते 180 दिवसांनी निम्म्यावर आलं. तर दुसरा डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी प्रमाण एक महिन्यात 4 ते 18 टक्क्यांनी वाढलं. या संशोधनासाठी 18 ते 55 वर्षीय व्यक्तींची निवड करण्यात आली होती.

कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर

सध्या बारतात कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर हे 2 ते 16 आठवड्यांचं म्हणजे 84 दिवसांचं आहे. बहुतेक देशांमध्ये हे अंतर 4 ते 12 आठवड्यांचं आहे.

लसींचा तुटवडा दूर होणार

ऑक्सफोर्डच्या अधिकाऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसात लसींचा तुटवडा दूर होईल. त्यामुळे व्हायरस विरुद्ध व्हॅक्सिन हे अभियान जगभरात वेगाने सुरु होईल. दोन लसींमध्ये जेवढं अंतर असेल, तेवढ्या जास्त लसी लोकांपर्यंत पोहोचतील. शिवाय लसींच्या निर्मितीचा वेगही वाढवला जाईल.

संबंधित बातम्या 

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या भारतीयांना युरोप प्रवासासाठी कटकटी, पुनावाला म्हणाले टेन्शन मिटवणारच  

Special Report on Vaccine | कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोणती लस अधिक प्रभावी?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI