पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाईपदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर ; 2 उमेदवारांना सर्वाधिक 98 गुण

परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र इतक्या सगळया गोष्टी करूनही पिंपरीतील परीक्षा केंद्रावर हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला होता. यात लेखी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराने तोंडाला लावायच्या मास्कमध्ये मोबाईल सदृश्य प्रकार तयार केला होता. ब्लू टूथच्या आधारे त्या मोबाईला लिंक करून परीक्षा देण्याचा त्याचा प्रयत्न होता.

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाईपदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर ; 2 उमेदवारांना सर्वाधिक 98 गुण
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांच्या भरतीसाठी नुकतीच लेखी परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबरला पारपडलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 100 गुणांच्या या लेखी परीक्षेत 2 उमेदवारांना सर्वाधिक 98 गुण मिळाले आहेत. तर सहा उमेदवारांना चक्क शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या दरम्यान सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या केंद्रवर पोचता आले नव्हते. तर परीक्षेला एक लाख 7  हजार 124 विद्यार्थी गैरहजर राहिले होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले होते. या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातील युवकांनी अर्ज केले होते. लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये, यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले होते.

परीक्षेत आढळला होता हायटेक कॉपीचा प्रकार लेखी परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून नये. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले होते. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र इतक्या सगळया गोष्टी करूनही पिंपरीतील परीक्षा केंद्रावर हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला होता. यात लेखी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराने तोंडाला लावायच्या मास्कमध्ये मोबाईल सदृश्य प्रकार तयार केला होता. ब्लू टूथच्या आधारे त्या मोबाईला लिंक करून परीक्षा देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र उमेदवाराच्या वर्तनाचा संशय आल्याने पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवत त्याची तपासणी केली. त्यामध्ये ही चोरी उघड झाली होती. मात्र आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसका देत तेथून पळ काढला होता.

Video – Nagpur उपलवाडीतील गोदामाला आग, तीन गोदाम जळून खाक

29 November 2021 Panchang| कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस, काय सांगते पंचांग जाणून घ्या

या 6 राशीच्या व्यक्ती आपल्या चुकांमधूनच शिकतात, तुमची रास यामध्ये आहे का ?

Published On - 9:51 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI