Pimpri Chinchwad RTO : वाहनचालकांच्या जिवाशी खेळ! पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत..!

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू अधिक आहेत. सर्वाधिक सुरक्षित वाहतूक कशी करायची, योग्य वाहनचालक रस्त्यावर उतरावा, यासाठी ड्रायव्हिंग स्कूल चालक आरटीओच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना प्रशिक्षण देत असतात. मात्र या संस्थाच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.

Pimpri Chinchwad RTO : वाहनचालकांच्या जिवाशी खेळ! पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत..!
पिंपरी चिंचवड आरटीओImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 9:51 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Pimpri Chinchwad RTO) केलेल्या तपासणीत पिंपरी चिंचवड शहरात 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. शहरात 188 वाहन प्रशिक्षण केंद्र असून त्यातील 38 केंद्रात त्रुटी आढळल्याचे परिवहन कार्यालयाच्या तपासणीत पुढे आले आहे. त्यामुळे वाहन शिकवणाऱ्या संस्था अधिकृत (Authorised) आहेत का, हे पाहून नागरिकांनी त्या ठिकाणी वाहन शिकायला जावे, असे आवाहन परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई केली जाईल, असे परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. वाहन अपघातांचे (Accident) प्रमाण एकीकडे वाढले असताना अशाप्रकारे अनधिकृत, त्रुटी असलेल्या संस्थांमुळे समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. आपला जीव आणि यासह इतरांचाही जीव सुरक्षित राहावा, म्हणून नागरिक चांगल्या वाहनचालक संस्थांच्या शोधात असतात, त्यात आता ही नवीच समस्या निर्माण झाली आहे.

अनेक संस्थांकडे परवानाच नाही?

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू अधिक आहेत. सर्वाधिक सुरक्षित वाहतूक कशी करायची, योग्य वाहनचालक रस्त्यावर उतरावा, यासाठी ड्रायव्हिंग स्कूल चालक आरटीओच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना प्रशिक्षण देत असतात. मात्र या संस्थाच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे वाहन शिकवण्याचा परवानादेखील नसल्याचे चित्र समोर आले आहे. या वाहनांची आरटीओ इन्स्पेक्टरने तपासणी केली असता, काही वाहने विनापरवाना धावत आहेत. शिवाय त्यात अनेक त्रुटीदेखील आहेत.

हे सुद्धा वाचा

आरटीओची नोटीस

आरटीओच्या अनेक नियमांची पायमल्ली याठिकाणी होत आहे. यात वाहनांची नोंद नसणे, वाहनांची आरटीओच्या नियमानुसार तपासणी नसणे, अनेक वाहनांची झालेली दुरवस्था याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ड्रायव्हिंग स्कूलच्या पत्त्यामध्ये बदल नसणे, स्कूल फॉर्म 11चे प्रमाणपत्र संबंधित चालकांकडे नसल्याचे निदर्शनास आले आहे. 2 जूनरोजी अशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर सात जूनपर्यंत मुदतही देण्यात आली होती. आता 12 जूननंतर यातील 18 वाहने कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहेत. तर काहींनी आरटीओला संबंधित नोटिशीचे उत्तर दिल्याने काहींचे परवाने नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.