PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला शुभेच्छा, इंदापूरचं शेतकरी कुटुंब भारावलं

नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून इंदापुरातील धनवडे पाटील कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला शुभेच्छा, इंदापूरचं शेतकरी कुटुंब भारावलं

इंदापूर : इंदापुरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात सध्या आनंदाचं दुहेरी वातावरण आहे. पहिलं म्हणजे धनवडे कुटुंबात लगीनघाई सुरु आहे, तर दुसरं म्हणजे लग्नाच्या निमित्ताने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नानासाहेब धनवडे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मुलाच्या लग्नाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याला उत्तर देताना मोदींनी धनवडे पाटील कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधूवरांना शुभेच्छा पत्र पाठवून आशीर्वादही दिले. (PM Narendra Modi wishes Indapur Couple for Wedding)

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील सराफवाडीत राहणाऱ्या संदीप धनवडे- पाटील परिवाराला विवाहाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभाशीर्वाद देण्यात आले आहेत. संदीप धनवडे हे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आहेत.

काय आहे शुभेच्छा संदेश?

नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून धनवडे पाटील कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला. “दीपक आणि वैभवी यांच्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. तुमच्या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणी मला बोलवले त्याबद्दल धन्यवाद. नवजीवनाच्या वर-वधूस मनापासून शुभेच्छा” असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.

“हा विवाह तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी तसेच विश्वास आणि मैत्रीचा धागा दोघांना सदैव बांधून ठेवेल. तुमच्या नात्यामध्ये स्नेह राहील. जीवनाच्या प्रवासात ते नाते अधिक घट्ट आणि मजबूत व्हावे, सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा” असंही त्यात मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून शुभ संदेश पाठविल्याने धनवडे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पीएम किसान योजनेचा सातवा हप्ता

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) सातवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) सातव्या हप्त्याद्वारे 2 हजार रुपये आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात  वर्ग करणार आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी 2000 रुपयांच्या स्वरुपात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट जमा केले जातात. आपण या योजनेचे लाभार्थी असल्यास आपण घरी बसून खात्यातील रक्कम आली की नाही, हे तपासू शकता.

संबंधित बातम्या :

यंदाच्या ख्रिसमसला मोदी सरकारकडून खास भेट, 8 कोटी शेतकऱ्यांना लाभ

प्रत्येक शेतकऱ्यानं मोदींच्या भाषणातले हे 10 मुद्दे वाचलेच पाहिजे

(PM Narendra Modi wishes Indapur Couple for Wedding)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI