Pune Crime : खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी लंपास केला 31 लाखांचा माल, पुण्यातल्या दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

दुकानातील 31 लाख 15 हजार 164 रूपये मूल्य असलेले मोबाइल संच व मनगटी घड्याळे आणि 10 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे, अशी प्राथमिक माहिती दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दिली.

Pune Crime : खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी लंपास केला 31 लाखांचा माल, पुण्यातल्या दौंड पोलिसांत गुन्हा दाखल
दुकानाची पाहणी करताना पोलीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:07 AM

दौंड, पुणे : शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील दुकानात चोरी (Theft) झाली आहे. या परिसरातील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स दुकानात ही मोठी चोरी झाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या छोट्या खिडकीचे गज वाकवून दुकानात प्रवेश केला. यावेळी तब्बल 30 लाख रुपये किंमतीचे मोबाइल आणि घड्याळे चोरट्यांनी लंपास केले आहेत. हा सगळा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाला आहे. या संदर्भात दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडचे डीवायएसपी राहुल धस यांनी चोरी झालेल्या दुकानाची पाहणी केली आहे. दौंड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आणि पोलीस उप अधीक्षक कार्यालयामागील प्रकाश इलेक्ट्रॅानिक्स या दुकानातून जवळपास 31.25 लाख रुपयांचे मोबाइल संच व घड्याळे चोरट्यांनी चोरून नेली आहेत.

खिडकीचे लोखंडी गज वाकवून केला प्रवेश

प्रकाश इलेक्ट्रॅानिक्स या दुमजली दुकानातील ही चोरी बुधवारी (ता. 18) सकाळी साडेनऊ वाजता निदर्शनास आली. दुकानाच्या तळघरात अवघी 9 इंच उंचीची व 3 फूट लांब असलेल्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आणि त्यासमोरील फ्रिजचे बॉक्स सरकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील 31 लाख 15 हजार 164 रूपये मूल्य असलेले मोबाइल संच व मनगटी घड्याळे आणि 10 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे, अशी प्राथमिक माहिती दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दिली. या बाबत दौंड पोलीस ठाण्यात संध्याकाळपर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती.

हे सुद्धा वाचा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण

उपअधीक्षक राहुल धस व निरीक्षक विनोद घुगे तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. पुणे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व ठसे तज्ज्ञ यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.