AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम

आम्ही राजकीय मंडळीच कोरोनाला हलक्यात घेत आहोत, अशी कबुली कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम
विश्वजीत कदम
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 20, 2021 | 9:47 AM
Share

सांगली :  महाविकास आघाडीमधील जवळपास 56 टक्के मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत तर आणखीही 4 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये ‘आमचे चुकतंय’ अशी  प्रांजळपणे कबुली दिली चावली आहे. (Political leaders Do not take Serius Corona Says Minister Vishwajeet Kadam)

दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावत नाही.. खरं तर ही आमची मोठी चूक आहे.. आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी  कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील  खानापूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकांमाचे उदघाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर विश्वजित कदम यांनी उत्तर दिलं.

सर्वसामान्यांना लस द्यायला आणखी वेळ लागेल

महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही भागांत तर लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार  करत आहे.सध्या राज्यात जरी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्वसामान्य लोकांना लस देण्याच्या प्रक्रियेला अजून बराच वेळ लागणार आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले.

कोरोनाविरोधी लढताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग ही आपली त्रिसूत्री

पुन्हा जरी कोरोना वाढतोय हे  चित्र खरे असले तरी राज्य सरकार कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांना लोकांची साथ हवी आहे. कोरोनाविरोधी लढताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग ही आपली त्रिसूत्री असल्याचंही विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ नाही

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ सरकार करतेय, असा आरोप हा चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्यावर बोलताना विरोधकांवी  केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असं विश्वजीत कदम म्हणाले.

अधिवेशन किती दिवस घ्यायचे याचा निर्णय समिती घेते

मागे कोरोनाच्या काळात जे अधिवेशन झाले त्यावेळी सर्व आमदारांना आणि त्याच्या खासगी कर्मचाऱ्यांना अधिवेशनाला येण्यापूर्वी  कोरोना टेस्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.यात 288 पैकी 78 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, अधिवेशन हे होणारच आहे पण अधिवेशनाचा कालावधी किती असावा ही समिती ठरवत असते. 25 तारखेच्या पुढे अधिवेशन किती दिवस घ्यायचे हा देखील निर्णय होईल, असंही ते म्हणाले.

(Political leaders Do not take Serius Corona Says Minister Vishwajeet Kadam)

हे ही वाचा :

Video : ‘देव करतो ते भल्यासाठीच करतो…’, ऐका धनंजय मुंडेंच्या तोंडून खास गोष्ट

‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा