AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली

आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर दोन वर्ष प्रशिक्षणाचा काळ असतो. त्या दरम्यान प्रशासन समजून घेणे, कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित असते. परंतु पूजा खेडकर यांनी कामाच्या ठिकाणी रुजू होण्यापासून आपला रुबाब दाखवणे सुरू केले. पुण्यातील प्रकरणाची फाईल राज्य शासनाकडे गेल्यावर त्यांची वाशिमला बदली झाली.

एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली
पूजा खेडकर
| Updated on: Aug 02, 2024 | 2:55 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत असणारे पूजा खेडकर हे नाव. केंद्रीय लोकसेवा आयोग, पंतप्रधान कार्यालय, दिल्ली पोलीस, मसूरी लाल बहादुर शास्त्री अकादमी या सर्वांनाच तिच्या प्रतापाची दखल घ्यावी लागली. वडील दिलीप खेडकर अधिकारी असल्यामुळे पूजा खेडकर हिच्या स्वभावात अधिकारीपदाचा रुबाब आला. मग पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रूजू होण्यापूर्वी गाडी आणि कॅबिनची ऑर्डर दिली गेली. गाडी न मिळाल्यामुळे स्वत:च्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावला. महाराष्ट्र शासन असा फलक लिहून शासकीय कार्यालयांमध्ये वावर सुरु केला. चमकेगिरी पूजा खेडकर हिला किती महागात पडणार? हे माहीतसुद्ध नव्हते. वैभव कोकाट या तरुणाने सोशल मीडियात पूजा खेडकर प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर देशभरात बातम्या आल्या. मग पूजा खेडकर याचे शारीरिक अपंगत्व आणि नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र संशयाच्या भवऱ्यात आले. आता सर्व काही गमावून बसली आहे. आयएएस पदही गेले तसेच पुन्हा कधी परीक्षा देऊ शकणार नाही. आई-वडील अडचणीत आले आहे.

पूजा खेडकर प्रकरणात तिच नाही तर तिची आई मनोरमा खेडकर अडचणीत आली. जुन्या गुन्ह्यात आता कारवाई झाली अन् सध्या कारगृहात त्या आहेत. पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर सध्या फरार आहे. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंद केलेली फाईल पुन्हा उघडली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

प्रमाणपत्रांवर प्रश्न?

आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर दोन वर्ष प्रशिक्षणाचा काळ असतो. त्या दरम्यान प्रशासन समजून घेणे, कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित असते. परंतु पूजा खेडकर यांनी कामाच्या ठिकाणी रुजू होण्यापासून आपला रुबाब दाखवणे सुरू केले. पुण्यातील प्रकरणाची फाईल राज्य शासनाकडे गेल्यावर त्यांची वाशिमला बदली झाली. तोपर्यंत अनेक चौकशीची प्रकरणे सुरु झाली होती. त्यात वडिलांकडे 40 कोटींची संपत्ती असताना पूजा खेडकर हिला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळले, तसेच अपंगत्वाच्या दाखल्यावर प्रश्न निर्माण झाले.

प्रमाणपत्र तपासण्याची स्वत:ची यंत्रणा नाहीच

यूपीएससीने जात प्रमाणपत्रासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. जात प्रमाणपत्रांची केवळ प्राथमिक छाननी यूपीएससी करते. कारण हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने जारी केले आहे. प्रमाणपत्र कोणत्या वर्षासाठी आहे, प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख, प्रमाणपत्रावर कोणतेही ओवररायटिंग आहे का, प्रमाणपत्राचे स्वरूप इत्यादी माहिती तपासते. हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने तपासले असेल तर सामान्यतः प्रमाणपत्र खरे मानले जाते. यूपीएससीकडे दरवर्षी हजारो उमेदवारांचे अर्ज येतात. परंतु ते तपासण्याची स्वतंत्र यंत्रणा नाही.

पूजा खेडकर प्रकरणाचा घटनाक्रम

  • जुलै पहिला आठवडा- पूजा खेडकर हिच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह
  • ८ जुलै – राज्य सरकारने वाशिममध्ये बदली केली
  • ११ जुलै- पुणे पोलिसांनी पूजाच्या घरावर नोटीस बजावली
  • १३ जुलै- पूजाची आई मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल
  • १६ जुलै- मसुरी प्रशिक्षण केंद्रात पूजाला परत बोलवले
  • १६ जुलै- यूपीएससीने पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल केला
  • २७ जुलै – दिल्ली न्यायालयात पूजाचा जामिनासाठी अर्ज
  • ३१ जुलै- पूजा खेडकर हिची निवड रद्द
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.