AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honey Trap : पुणे हनी ट्रॅप प्रकरणातील प्रदीप कुरुलकर नेमके दडवतोय काय? आता होणार उघड

Pune News Honey Trap : पुणे शहरात उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यानंतर आता प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी करण्याची मागणी तपास संस्थेने केली आहे.

Honey Trap : पुणे हनी ट्रॅप प्रकरणातील प्रदीप कुरुलकर नेमके दडवतोय काय? आता होणार उघड
| Updated on: Jul 22, 2023 | 9:48 AM
Share

योगेश बोरसे, पुणे | 22 जुलै 2023 : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहे. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या जाळ्यात अडकून त्याने देशातील गोपणीय माहिती दिली. या प्रकरणी एटीएसने तपास करुन पुणे न्यायालयात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता तपास संस्थाने पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसच्या वकिलांनी केली. या चाचणीला प्रदीप कुरुलकर याच्याकडून विरोध करण्यात आला आहे.

सरकारी वकिलांनी काय केले

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याच्या व्हाईस लेअर चाचणी आणि सायकोलॉजिकल ॲनलिसिस चाचणीस परवानगीची गरज नाही. या चाचणीतून कुरुलकर काय माहिती दडवतोय, ते समोर येणार आहे. या चाचणीत आरोपीविरुद्ध कोणत्याही गोष्टींचा वापर केला जाणार नाही. पॉलीग्रॉफ अन् लाय डिटेक्टर चाचणीला परवानगी हवी असते, असा लेखी युक्तीवाद एटीएसकडून सादर करण्यात आला. आता या विषयावर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने काय म्हटले होते

प्रदीप कुरुलकर याची व्हाईस लेअर चाचणी आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी तपास संस्थेकडून वकील विजय फरगडे यांनी केली होती. त्यावर दोन्ही चाचण्यांमधील फरक स्पष्ट करण्याचे आदेश न्यायाधीश एस.बी.कचरे यांनी दिले होते. या चाचण्यांना प्रदीप कुरुलकर याने विरोध दर्शवला होता. आता २ ऑगस्ट रोजी यासंदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे.

काय आहे प्रकरण

डीआरडीओचे संचालक असलेल्या प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तान हेर झारा दासगुप्ता हिच्या संपर्कात होते. तिला देशातील अनेक गुपित माहिती दिली. भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती दिली. तसेच ब्रह्मोस, अग्नी या क्षेपणास्त्राची गुपिते दिली. मिसाईल लाँचरबाबतही माहिती पाकिस्तानला पुरवली. एटीएस आणि एनआयएने प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी केली. त्यानंतर सुमारे दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. आता त्याच्या  व्हाईस लेअर चाचणीसंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.