बळ बळ करणाऱ्या महाविकास आघाडीला, जनताच पळ काढायला लावेल; प्रवीण दरकेरांचा घणाघात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 14, 2021 | 5:24 PM

काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या या विधानावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडीवर टीका केली आहे. (pravin darekar slams maha vikas aghadi over alliance)

बळ बळ करणाऱ्या महाविकास आघाडीला, जनताच पळ काढायला लावेल; प्रवीण दरकेरांचा घणाघात
Pravin Darekar

लोणावळा: काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या या विधानावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडीवर टीका केली आहे. सरकाच्या नाकर्तेपणामुळे जनतेच्या बाहुत बळ राहिले नाही. अश्याच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल तर बळ बळ करता करता ही जनताच यांना पळ काढायला लावल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. (pravin darekar slams maha vikas aghadi over alliance)

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी चिटणीस रमेश पाळेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सर्वश्री विजय पाळेकर, बिंदरा गणतंत्रा, अॅड. राहुल पोळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाचे पडले आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हातात ताकद राहिलेली नाही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. आज राज्यातील कामगार देशोधडीला लागलाय. त्या कामगारांच्या हातात बळ राहिलेले नाही. बेरोजारांना रोजगार मिळत नाही, पण अशा वेळी सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.

सरकारला जनतेशी देणंघेणं नाही

काँग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला. महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतकऱ्यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झालाय, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या स्वबळाचं राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणं-घेणं नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचं काही पडलेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांना केवळ सत्ता टिकवण्याची चिंता

राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहील याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे, असेही दरकेर यांनी स्पष्ट केले. (pravin darekar slams maha vikas aghadi over alliance)

संबंधित बातम्या:

कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच; चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला

संघ इतका का बदलतोय? त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे: संजय राऊत

एमपीएससीची पदे भरणार, 15, 511 पदांची भरती लवकरच; दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

(pravin darekar slams maha vikas aghadi over alliance)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI