Monsoon Update : अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे यायला सुरुवात, राज्यात मान्सूनचे संकेत

Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. मान्सूनपूर्व पाऊस कोकणात कधी दाखल होणार आहे? याची माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच हिट व्हेवपासून दिलासा मिळणार आहे.

Monsoon Update : अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे यायला सुरुवात, राज्यात मान्सूनचे संकेत
Mansoon
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 1:41 PM

प्रदीप कापसे, पुणे : मे महिन्यात तापमान सर्वत्र वाढले. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंशांचा वर पारा गाठला आहे. अनेक ठिकाणी कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे. यामुळे मान्सून कधी येणार? याची वाट पाहिली जात आहे. यासंदर्भात सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात मान्सून कधी येणार? याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला जोमाने लागावे, अशी ही बातमी आहे.

कधी येणार मान्सून

अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहे. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. सध्या सुरु असलेली उष्णतेच्या लाटेपासून अजून दिलासा नाही. उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. परंतु लवकरच मान्सून आगमन होणार असल्याची चाहुल लागली आहे. यामुळे राज्यात वेळेवर सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

स्कायमेटचा काय आहे अंदाज

स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 7 जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती अशीच राहिल्या केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो.

सध्या कुठे आहे मान्सून

नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. त्यानंतर अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाणार आहे.

बिहारमध्ये उष्णतेची लाट, मध्य प्रदेशात पाऊस

बिहारमध्ये उष्णतेची लाट सुरु आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशात पाऊस पडत आहे. रांचीमध्ये तापमान ४६ अंशांवर गेले आहे. दिल्लीत यलो कार्ड जारी केले आहे. वायव्य भारतातील पश्चिम अडथड्यांमुळे पूर्व हिमालय भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. २३ ते २५ मे दरम्यान पाऊस पडणार आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.