AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीक्षेत्र देहूत, मोदींनीही ट्विट करत दिली दौऱ्याची माहिती; वाचा संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतील श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचालोकार्पण सोहळा केल्यानंतर वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. देहूतील या सभा स्थळापर्यंत जाण्यासाठी ई बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीक्षेत्र देहूत, मोदींनीही ट्विट करत दिली दौऱ्याची माहिती;  वाचा संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक
नरेंद्र मोदी Image Credit source: TV9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 14, 2022 | 10:48 AM
Share

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्याहस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पारपडणार आहे. यासाठी आज मंगळवारी (14  जून) रोजी मोदी श्रीक्षेत्र देहू येथे उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याची तयारी झाली असून देहूत पोलिसांचा (Police) तगाडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मोदींचा दौरा लक्षात घेत पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर देहूतील शिळा मंदीरापर्यंत कारने जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदी जाणाऱ्या मार्गावर बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.

असा असेल मोदींचा दौरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शश्री क्षेत्र देहूकडे प्रयाण करतील.
  • एक वाजून 45 मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील.
  • पंतप्रधान मोदी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा 20 मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल.
  • दुपारी दोन वाजून 10  मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी 50 मिनिटांची सभा होईल.

सभास्थळापर्यंत जाण्यासाठी ई- बसची व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतील श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचालोकार्पण सोहळा केल्यानंतर वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. देहूतील या सभा स्थळापर्यंत जाण्यासाठी ई बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मोदींच्या सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांनाही व्हीआयपी पास देण्यात आला आहे. पास दाखवून वारकऱ्यांना बसमार्फत सोडलं जाणार सभास्थळापर्यंत सोडण्यात येणार आहे.

मोदींनीही ट्विट करत दिली माहिती

“मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीना भेटणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं.” असे ट्विट करा पंत प्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा