पुण्यात लव्ह जिहादवरुन हिंदुत्ववादी-संविधानवादी आमनेसामने, कुणाचं मत काय?

पुण्यात मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणी लग्न करु इच्छितात, जाती धर्माच्या परंपरा मोडून नवा संसार थाटू इच्छितात, प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्याला जात, धर्म, पंथ विसरुन कायमचं एक व्हायचंय. पण काही संंस्कृती रक्षकांना ही गोष्ट मान्य नाहीय.

पुण्यात लव्ह जिहादवरुन हिंदुत्ववादी-संविधानवादी आमनेसामने, कुणाचं मत काय?
पुण्यात लव्ह जिहादवरुन हिंदुत्ववादी-संविधानवादी आमनेसामने, कुणाचं मत काय?
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 2:59 PM

पुणे : पुण्यात मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणी लग्न करु इच्छितात, जाती धर्माच्या परंपरा मोडून नवा संसार थाटू इच्छितात, प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्याला जात, धर्म, पंथ विसरुन कायमचं एक व्हायचंय. पण काही संंस्कृती रक्षकांना ही गोष्ट मान्य नाहीय. त्यांना याच्यात लव्ह जिहाद दिसतोय. फसवणूक दिसतीय, प्रलोभन दिसतंय, धर्मांतराचं मोठं षडयंत्र दिसतंय… यातूनच त्यांनी जोडप्यांच्या कुटुंबियांना धमकवायला सुरुवात केलीय. जोडप्याची बाजू घेण्यासाठी आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी ‘राईट टू लव्ह’ संस्था आणि पुण्यातील संविधानवादी कार्यकर्ते एकत्र आलेत… तर हे लग्न होऊ नये, यासाठी तथाकथित संस्कृती रक्षक पुढे सरसावलेत. (Pro Hindu-Constitutionalist confrontation over love jihad in Pune, whose opinion is it?)

‘राईट टू लव्ह संस्थे’च्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

पुण्यात ‘राईट टू लव्ह’ नावाची संस्था आहे जी संस्था प्रेमवीरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून त्यांच्या लग्न कार्यात येणाऱ्या अडअडचणी किंवा कायदेशीर अडथळे सोडवते. याच संस्थेचे पदाधिकारी के अभिजीत याविषयी बोलताना म्हणाले, “लग्न करणारं जोडपं उच्चशिक्षित आहे… दोघेही सज्ञान आहेत…. कायद्याने त्यांना लग्न करण्याचा अधिकार दिला आहे… जर संविधानानेच जोडप्याला अधिकार दिलाय तर मग त्यांच्या अधिकारावर घाला कसं कुणी घालू शकतं?”, असा सवाल के अभिजित यांनी उपस्थित केला. “जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्याचे प्रकार चुकीचे आहेत. या प्रकरणी ‘राईट टू लव्ह संस्था’ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे”, असं राईट टू लव्ह संस्थेचे पदाधिकारी के अभिजीत यांनी सांगितलं.

“कट्टर हिंदू संघटनांचे आणि मुस्लीम संघटनांचे कार्यकर्ते मिळून आंतरधर्मीय लग्न करणारे जोडपी शोधतात, त्यांच्या कुटुंबियांना शोधतात, त्यांना फोनवरुन धमकावून, प्रसंगी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावतात, असा आमचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणांचा तपास सरकारने केला पाहिजे अशी आमची मागणी आहे, त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत”, असं संस्थेचे पदाधिकारी महेश शिंदे यांनी सांगितलं.

“मुळात भारतीय राज्य घटनेने कुणाबरोबर मैत्री करायची? कुणावर प्रेम करायचं? कुणाबरोबर लग्न करायचं? याचा अधिकार दिलेला असताना मग हे तथाकथित संस्कृतीरक्षक लव्ह जिहादच्या नावाखाली असले चाळे का करत आहे? यांना सामाजिक वातावरण दूषित करण्याचा अधिकार कुणी दिला?, असा संतप्त सवाल महेश शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

“2017 मध्ये सुप्रीम कोर्टासमोर केरळ राज्यातली अशीच एक केस आली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने तपास करायला सांगितला. 2017 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार असताना देखील सरकारनं सुप्रीम कोर्टात रिपोर्ट दिला की लव्ह जिहाद सारखं कोणतंही प्रकरण नाही…. मग जर सरकार आणि तपास यंत्रणा लव्ह जिहाद मान्य करत नाही कर मग हे धर्माचे ठेकेदार संबंधित जोडप्यांना का विरोध करतात?, असा सवाल करत लव्ह जिहादच्या नावाखाली सामाजिक वातावरण जे कुणी दूषित करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा” अशी मागणी यावेळी महेश शिंदे यांनी केली.”

हिंदुत्ववादी संघटनेचं मत काय?

“संबंधित जोडप्याला कायद्याने आणि घटनेने लग्नाचा अधिकार दिलाय हे आम्हाला मान्य आहे… आम्ही त्याचा आदर करतो, मान ठेवतो… परंतु आंतरधर्मीय लग्नामध्ये आमच्या एक गोष्ट लक्षात आलीय की फसवणूक आणि आर्थिक प्रलोभने देऊन अशी लग्न होतात…अशा अनेक घटना आमच्या समोर आहेत. अशा वेळी लोकांमध्ये जाऊन आम्ही जागरूकता निर्माण करण्याचं काम करतो. अशा जोडप्यांना आणि पालकांना आम्ही समजावून सांगतो, मूळ प्रकरण आणि घटना त्यांच्या लक्षात आणून देतो… जर आमच्या विनंतीला तुम्ही धमकी समजत असाल तर हे काही उचित नाही….,” असं मत ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडलं.

“या देशामध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विविध प्रलोभने देऊन लग्नाच्या माध्यमातून धर्मांतराचे प्रकार या देशात समोर आलेले आहेत. या प्रकारांनी हिंदूंची लोकसंख्या कमी होत चाललेली आहे. सध्या या देशात हिंदू बहुसंख्याक आहे पण असेच जर प्रकार या देशात सुरु राहिले तर एक दिवशी हिंदू अल्पसंख्यांक म्हणून गणला जाईल आणि आम्ही ते होऊ देणार नाही, याअगोदर देशाचे तुकडे धर्मावर आधारित झालेले आहेत, आता आम्ही असे प्रकार होऊ देणार नाही”, असं आनंद दवे म्हणाले.

मुस्लिम सत्यशोधक संघटनेचं मत काय?

“देशातलं सुप्रीम कोर्ट म्हणतं लव्ह जिहाद नाही…. केंद्रातलं भाजप सरकार म्हणतं लव्ह जिहाद नाही… पण एक खोटं शंभर वेळा बोललं की ते खरं वाटायला लागतं… ही गोबेल्सची नीती आहे… सात-आठ वर्षांपूर्वी लव्ह जिहाद हा शब्द कुणी ऐकला होता का? मग आता कुठून आला हा शब्द?”, असे सवाल मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते समीर शेख यांनी उपस्थित केले. तर फसवणूक आणि प्रलोभनांसाठी असे विवाह होतात आणि त्याचा मूळ हेतू धर्मांतरच असतो, असा दावा करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना समीर शेख यांनी आकडेवारी सादर करण्याचं आव्हान दिलं. तसंच स्वजातीय आणि स्वधर्मीय लग्नात फसवणूक होत नाही काय? असा सवालही समीर शेख यांनी यावेळी उपस्थित केला.

एकंदरितच भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली. परंतु या दरम्यान आपण खरंच पुरोगामित्वाची कास धरली आहे का? असा सवाल आता आपल्यालाच विचारावा लागतोय. कारण संविधानाने दिलेल्या अधिकाराचं हनन होत असताना कारवाई करण्याऐवजी इथलं सरकार डोळे झाकून अशा घटनांकडे पाहतंय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.