पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांतील ग्रामसेवक बदलणार

Pune Village | आज 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्य सरकारकडे विकास आराखड्यासंदर्भात संदर्भात तक्रार करू, तसेच काही मंडळी न्यायालयात जातील, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांतील ग्रामसेवक बदलणार
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 7:54 AM

पुणे: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आदेश काढण्यात आले आहेत. ग्रामसेवकांना हवेली आणि मुळशी तालुक्‍यांच्या बाहेरील तालुक्‍यांमध्ये समुपदेशन करून नेमणुका देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. 23 गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे या गावांमधील अतिरिक्त ग्रामसेवकांचे काय करायचे, हा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र, आता या सर्वांच्या 31 जुलैपूर्वी बदल्या करण्यात येणार आहेत.

तर दुसरीकडे आज 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्य सरकारकडे विकास आराखड्यासंदर्भात संदर्भात तक्रार करू, तसेच काही मंडळी न्यायालयात जातील, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे पुण्यातील 23 नव्या गावांची जबाबदारी

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे नव्या तेवीस गावांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा (Pune new 23 villages) महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय गेल्या वर्षअखेरीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदेशाने झाला होता. 23 गावांमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबंधित गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती राष्ट्रवादीतर्फे देण्यात आली होती.

ती 23 गावे कोणती?

  1. खडकवासला
  2. किरकटवाडी
  3. कोंढवे धावडे
  4. मांजरी बुद्रूक
  5. नांदेड
  6. न्यू कोपरे
  7. नऱ्हे
  8. पिसोळी
  9. शेवाळवाडी
  10. काळेवाडी
  11. वडाची वाडी
  12. बावधन बुद्रूक
  13. वाघोली
  14. मांगडेवाडी
  15. भिलारेवाडी
  16. गुजर निंबाळकरवाडी
  17. जांभूळवाडी
  18. होळकरवाडी
  19. औताडे हांडेवाडी
  20. सणसनगर
  21. नांदोशी
  22. सूस
  23. म्हाळुंगे

संबंधित बातम्या:

Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी

पुण्यातील 23 नव्या गावांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, PMPML कडूनही वाहतुकीची चाचपणी

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे पुण्यातील 23 नव्या गावांची जबाबदारी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.