AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील विद्यार्थी पर्यटनासाठी गेले, देवगडच्या समुद्रात उतरले, चार विद्यार्थिंनीचा बुडून मृत्यू

Pune News devgad beach | सैनिक अकॅडमीमधील विद्यार्थ्यींची सहल जिवावर बेतणारी ठरली. अकादमीचे विद्यार्थी पोहण्यासाठी देवगडच्या खोल समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहा विद्यार्थी बुडाले. त्यातील चौघ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.

पुण्यातील विद्यार्थी पर्यटनासाठी गेले, देवगडच्या समुद्रात उतरले, चार विद्यार्थिंनीचा बुडून मृत्यू
devgad beach
| Updated on: Dec 10, 2023 | 7:57 AM
Share

पुणे | 10 डिसेंबर 2023 : पुणे शहरातील निगडी येथील सैनिक अकॅडमीमधील विद्यार्थी सहलीसाठी देवगडला गेले. शहराची आनंद लुटत असताना सहा जण देवगडच्या समुद्रात उतरले. पोहण्यासाठी खोल समुद्रात गेले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहा विद्यार्थी बुडाले. त्यातील चौघ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. एकाला वाचवण्यात यश आले आहे. परंतु एक जण अजून बेपत्ता आहे. पुण्यातील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे शनिवारी गेली असताना ही दुर्घटना घडली. त्यातील चार मुलींचा मृत्यू झाल्यानंतर ग्रुपमधील सर्वांना अश्रू आवरता आले नाही. सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रश ह्रदय पिळवटून लावणारा होता. देवगड किनारपट्टीवर चौघांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

कशी घडली घटना

देवगड समुद्र किनाऱ्यावर काही विद्यार्थी पवनचक्की येथून खाली देवगड बीच येथे उतरले. त्यांना समुद्र स्नानाचा आनंद घेण्याचा मोह झाला. त्यामुळे काही जण पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बुडू लागले. विद्यार्थी बुडत असल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड सुरु केली. यावेळी स्थानिक लोकांनी धाव घेतली. जीवरक्षक घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाण्यात उतरुन प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, राम डिचोलकर या चौघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण पडले. त्या विद्यार्थिनींना देवगड ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

वाचवण्यास गेलेला डिचोलकर बेपत्ता

बुडत असताना मुलींना वाचवण्यासाठी रामचंद्र डिचोलकर समुद्रात उतरला. परंतु लाटांमध्ये तो बेपत्ता झाला. अक्षय तुपे या विद्यार्थ्यास वाचवण्यात यश आले आहे.  त्याचा शोध सुरु आहे. देवगडच्या समुद्रकिनारा खोल नाही. तो पर्यटकांसाठी सुरक्षित आहे. परंतु पाण्यात खोल जाऊ नये, असे स्थानिक लोक वारंवार सांगत असतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फाजील आत्मविश्वासातून काहीजण खोल समुद्रात जातात आणि लाटांमध्ये अडकून बुडतात. समुद्रकिनाऱ्यांवरती सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.