येरवड्यात 8 मजली नवीन फौजदारी न्यायालय उभारलं जाणार, शिवाजीनगर न्यायालयावरील ताण कमी होणार

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येरवड्यातील न्यायालयाच्या उभारणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरु आहे. सरकारकडून विधी व न्याय विभागाला निधी मंजूर होताच नवीन न्यायालयाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

येरवड्यात 8 मजली नवीन फौजदारी न्यायालय उभारलं जाणार, शिवाजीनगर न्यायालयावरील ताण कमी होणार
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 8:19 AM

पुणे: जिल्हा व सत्र न्यायालयात दावे आणि प्रकरणाची संख्या वाढू लागल्यानं न्यायालयाला सुनावणीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे येरवडामध्ये लवकरच 8 मजली फौजदारी न्यायालयाची उभारणी केली जाणार आहे. येरवड्यात नवीन न्यायालयाच्या उभारणीमुळे शिवाजीनगर न्यायालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. (A new criminal court will be set up in Yerwada area)

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येरवड्यातील न्यायालयाच्या उभारणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरु आहे. सरकारकडून विधी व न्याय विभागाला निधी मंजूर होताच नवीन न्यायालयाच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिवाजीनगर न्यायलयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायालय आणि लघुवाद न्यायालये अशा एकूण 4 इमारती आहेत. सर्व न्यायालये एकाच इमारतीमध्ये असल्यानं तिथे गर्दी होत होती. तसंच दावे आणि प्रकरणांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यापार्श्वभूमीवर नवीन न्यायालयाच्या उभारणीमुळे न्यायपालिकेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.

महसूल विभागाकडून जागा उपलब्ध

न्यायालयावरील ताण वाढत असल्याने नवीन इमारतीसाठी जागा शोधण्याचं काम सुरुच होतं. महसूल विभागाकडे त्यासाठी मागणीही करण्यात आली होती. विधी व न्याय विभागाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महसूल विभागानं विमानतळ रस्त्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आवारातील 8 हजार 100 चौरस मीटर जागा न्यायालयासाठी देऊ केली आहे. त्यामुळे फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सुरक्षा यंत्रणेवरील ताण कमी होणार

शिवाजीनगर न्यायालयात विविध गुन्ह्यातील आरोपींना आणलं जातं. त्यांच्यासोबत सुनावणीसाठी नातेवाईकही येतात. त्यामुळे न्यायालय परिसरात सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होतो. येरवडा परिसरात नवीन न्यायालयाची उभारणी झाल्यावर हा ताण कमी होणार आहे. त्याचबरोबर नवीन न्यायालय हे येरवडा कारागृहापासून काही अंतरावर असल्यामुळे आरोपींना न्यायालयात हजर करणंही सोयीचं होणार आहे.

अंदाजपत्रकाचे काम सुरु

नवीन फौजदारी न्यायालयाची इमारत ही 8 मजली असणार आहे. त्यात एकूण 24 हॉल उभारले जाणार असल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरु आहे. ते तयार झाल्यावर न्यायालयाला सादर केलं जाईळ. त्यानंतर विधी व न्याय विभागाकडून निधी मंजूर करण्यात येईल आणि मग इमारतीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

ज्ञान प्रबोधिनी आणि अमेरिकेतील विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम, पुणेकरांवरील कोविडच्या परिणामांचा अभ्यास करणार

पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, 35 दिवसांनंतर बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

A new criminal court will be set up in Yerwada area

Non Stop LIVE Update
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप.
फडणवीसांना तुरूंगात टाका, 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
फडणवीसांना तुरूंगात टाका, 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल.
'प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं...',सुशील कुमार शिंदेंचं मोठ विधान
'प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं...',सुशील कुमार शिंदेंचं मोठ विधान.
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट.
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.