ज्ञान प्रबोधिनी आणि अमेरिकेतील विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम, पुणेकरांवरील कोविडच्या परिणामांचा अभ्यास करणार

जगभरातील विविध विद्यापीठात शिकणारे 40 पुणेकर युवा शास्त्रज्ज्ञ पुणेकरांवरील कोविडच्या परिणामांचा अभ्यास करणार आहेत. 40 शास्त्रज्ज्ञांचा हा गट सामुदायिक शाहाणपण या मानसशास्त्रातील तंत्राचा वापर करुन परिस्थिती बद्दलचे अंदाज वर्तवणार आहे.

  • अश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 9:51 AM, 26 Nov 2020
First signs of herd immunity in small population groups in Pune

पुणे: ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या माध्यमातून एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील विविध विद्यापीठात शिकणारे 40 पुणेकर युवा शास्त्रज्ज्ञ पुणेकरांवरील कोविडच्या परिणामांचा अभ्यास करणार आहेत. हा गट पुणेकरांमधील कोविड परिस्थितीबद्दलची जागरुकता, सवयी आणि त्यांच्या कोविडचे झालेले आरोग्यविषयक तसेच आर्थिक परिणामांचा अभ्यास करणार आहेत.(The results of covid in Pune peoples will be studied)

40 शास्त्रज्ज्ञांचा हा गट सामुदायिक शाहाणपण या मानसशास्त्रातील तंत्राचा वापर करुन परिस्थिती बद्दलचे अंदाज वर्तवणार आहे. आयआयटी, अजीम प्रेमजी, कॅलटेक, परडयू, जॉन हॉपकिन्स, अशा विविध अग्रगण्य विद्यापीठांमधील विद्यार्थी पुणेकरांच्या मदतीसाठी समोर आले आहेत. मशीन लर्निंग, मानसशास्त्र, संख्याशास्त्र, तंत्रज्ञान, डेटा सायन्स अशा विविध शाखांचा एकत्र वापर करुन हा संशोधन प्रकल्प राबवला जाणार आहे.

35 दिवसांनंतर बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

35 दिवसांच्या खंडानंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा 1 हजाराहून अधिक कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल 1 हजार 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी 1 हजार 20 रुग्ण आढळले होते. गेल्या महिनाभरात पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या सातत्यानं कमी होताना पाहायला मिळत होती. 16 नोव्हेंबरला आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे फक्त 359 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 11 हजार 572 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळत असल्यानं प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 357 रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुसऱ्या लाटेची जरी शक्यता असली तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, घाबरुन जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले.

“पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका, काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.मागील काही दिवसांत अनेक निष्पाप लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आपण जम्बो कोविड हॉस्पिटल उभारले आहे. आरोग्य यंत्रणेनेही चांगलं काम केलंय. त्यांनाही पुणेकरांनी सहकार्य करावं”, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

पुणे महानगरपालिका मुख्यालयातील 45 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणे महानगरपालिकेचं ‘सुपर स्प्रेडर्स’वर लक्ष

The results of covid in Pune peoples will be studied