Video : प्लीज… प्लीज… प्लीज…! कॅमेऱ्यासमोर अल्पवयीन आरोपीची आई ढसाढसा रडली, पाहा नेमकं काय म्हणाली?

Vedant Agarwal Mother Shivani Agarwal Video : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये शिवानी अग्रवाल यांनी मीडियासह पुण्याच्या आयुक्तांना विनंती केली आहे. व्हिडीओमध्ये त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घ्या.

Video : प्लीज... प्लीज... प्लीज...! कॅमेऱ्यासमोर अल्पवयीन आरोपीची आई ढसाढसा रडली, पाहा नेमकं काय म्हणाली?
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 3:00 PM

पुणे कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे. बिल्डरच्या मुलाला बाल हक्क न्यायालयाने 14 दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एका रॅप साँगने वातावरण तापवलं होतं. या व्हिडीओतील तरुण अर्वाच्च भाषेत बोलताना दिसला. इतकंच नाहीतर शिवीगाळही करतोय. तो कारमध्ये बसलेला असून अल्पवयीन असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो व्हिडीओमधील तरूण बिल्डरचा मुलगा असल्याचं समजून नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं. अशातच यावर मुलाची आई शिवानी अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत ते रॅप साँग वेदांतचं नसल्याचं म्हटलं आहे.

शिवानी अग्रवाल काय म्हणाल्या?

माझी मीडियाला विनंती आहे की रॅप साँगचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो माझ्या मुलाचा नसून तो फेक आहे. माझा मुलगा बाल सुधार कारागृहात असल्याचं शिवानी अग्रवाल सांगत आहेत. त्यासोबतच प्लीज माझ्या मुलाला वाचवा अशी विनंतीही शिवानी अग्रवाल यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं रॅप साँग अपघातातील अल्पवयीन मुलाचं असल्याचा दावा केला. त्यामुळे लोकांचा वेदांतबद्दलचा रोष आणखी वाढला. कारण दोन जणांचा जीव घेऊनही त्याला अजिबात पश्चाताप नसल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत म्हटलं. मात्र काही वेळाने तो व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं. लोकांच्या मनात गैरसमज होऊ नयेत म्हणून मुलाची याची आई कॅमेरासमोर आली आणि तो व्हिडीओ आपल्या मुलाचा नसल्याचं सांगितलं.

ड्रायव्हरचा मोठा खुलासा

दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी केली. यावेळी ड्रायव्हर याने मोठा खुलासा केला की, मुलाला गाडी चालवण्यासाठी दे असा फोन त्याच्या वडिलांनी म्हणजेच विशाल अग्रवाल यांनी केला.

EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.