AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे बलात्कार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता थेट फाशी…”

पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची मागणी केली असून, पोलिसांना तातडीने आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे बलात्कार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता थेट फाशी...
ajit pawar pune
| Updated on: Feb 26, 2025 | 7:25 PM
Share

पुण्यात वर्दळीचे स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती त्यावेळी ही घटना घडली. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. आता याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

काल सकाळी पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु आहे. माझं सीपींशी बोलणं झालं आहे. त्यात संशयितदृष्ट्‍या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय, पण तो अजून सापडलेला नाही. पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

त्याला फाशीची शिक्षा करणार…

महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसतात. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला, असेही अजित पवार म्हणाले.

तो मुलगा ताब्यात आल्यानतंर ताबडतोब कारवाई करणार…

सूसंस्कृत महाराष्ट्राला आणि पुणेकरांना कोणालाही पटणारी नाही. तिथे जवळ पोलीस चौकीदेखील आहे. तो मुलगा ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करायची, कशी करायची, ही केस लवकर कशी चालेल याबद्दल सगळी खबरदारी घेत आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा