Pune traffic : गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी घातली बंदी; वाहतूककोंडी सुटण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये प्रयोग

चंद्रकांत पाटील यांनी एसपीपीयू जंक्शन, चांदणी चौक, नवले पूल आणि वाघोली येथे शहरातील प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune traffic : गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी घातली बंदी; वाहतूककोंडी सुटण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये प्रयोग
अवजड वाहने, चांदणी चौकातलं दृश्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 7:30 AM

पुणे : वाहतूक पोलिसांनी (Traffic police) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमार्गे जड वाहनांना 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 8 ते सकाळी 11 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत बंदी घातली आहे. विकासकामे आणि खड्डेमय रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी चांदणी चौकाजवळ (Chandani chowk) महामार्ग रोखून ट्रक आणि कारचा ताबा सुटल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतुकीत अडकला होता. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाहतूक समस्यांबद्दल माहिती दिली. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गर्दीच्या वेळी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर (Heavy vehicles) बंदी घालण्याचे आदेश दिले होते. शहरातील विविध भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे पोलीस, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि महा मेट्रो यांचा समावेश असलेला सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, पुणे उपपोलीस आयुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अधिकारी संजय कदम यांनी चांदणीला भेट दिली. चौकात शनिवारी आणि नंतर झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेतले. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन वाहतुकीचा आढावा घेतला.

विविध विकासकामांमुळे सध्या गैरसोय

पाटील म्हणाले, की पुणे शहरात 1,400 किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे असून, 1,100 किलोमीटरच्या रस्त्यांच्या जाळ्यावर विकासकामे सुरू आहेत. साहजिकच यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. सध्या मेट्रो, 24×7 पाणी योजना, ड्रेनेज आणि प्रस्तावित JICA प्रकल्पांसाठी काम सुरू आहे. पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासोबत बैठक घेतली त्यावेळी पुणे महापालिका आणि पीएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन आराखड्याच्या सूचना

चंद्रकांत पाटील यांनी एसपीपीयू जंक्शन, चांदणी चौक, नवले पूल आणि वाघोली येथे शहरातील प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान एसपीपीयू येथे मिलेनियम गेट उघडण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.