पूजा चव्हाणचा लॅपटॉप पुण्यातील भाजप नगरसेवकाने चोरला?

| Updated on: Mar 04, 2021 | 9:22 AM

वानवडीचे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप चोरल्याचा दावा केला जात आहे. (BJP Corporator steal Pooja Chavan Laptop)

पूजा चव्हाणचा लॅपटॉप पुण्यातील भाजप नगरसेवकाने चोरला?
पूजा चव्हाण
Follow us on

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Death Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप नगरसेवकाने पूजाचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप केला जात आहे. वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogare) यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे काही व्हिडीओ नुकतेच समोर आले होते. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं बोललं जातं. (Pune BJP Corporator Dhanraj Ghogare allegedly steal Pooja Chavan Laptop)

धनराज घोगरे कोण आहेत?

धनराज घोगरे हे पुणे महापालिकेतील नगरसेवक
वानवडी वॉर्डमधून भाजपच्या तिकीटावर नगरसेवक
पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्ष
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी दाखल गुन्ह्यात नाव

भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात तक्रार

अॅड. रमेश राठोड यांनी केलेल्या तक्रारीत भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरसेवक धनराज घोगरे, युवा मोर्चा पुणे शहर यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लॅट बंद असताना मोबाईल आणि लॅपटॉपमधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर कशी गेली? असा प्रश्नही या तक्रारीत विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त यांनाही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

व्हिडीओंमध्ये नेमकं काय आहे?

पूजा चव्हाण, संजय राठोड यांच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होती, अशी माहिती मिळालीय. आणि त्याच प्रकारचे व्हिडीओही पूजाच्या लॅपटॉपमधूनच समोर आलेत. संजय राठोड मतदारसंघात फिरत असल्याचे, नागरिकांशी संवाद साधत असल्याचे फोटो आणि व्हिज्युवल्स घेऊन राठोडांचे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.

राठोडांच्या प्रचाराची जबाबदारी पूजाकडे?

भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्येही राठोड मंत्री होते. त्यावेळचे व्हिडीओही हाती लागलेले आहेत. सोशल मीडियावर एखाद्या नेत्यांचा प्रसार करण्यासाठी, जशी गाणी आणि डायलॉग लावून व्हिडीओ तयार केले जातात, अगदी त्याच प्रकारे हे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.

या व्हिडीओवरुन सहज लक्षात येण्यासारखं आहे की, सोशल मीडियावर राठोडांच्या प्रचाराची जबाबदारी, एक तर पूजाकडे होती किंवा पूजा कोणाकडून तरी हे व्हिडीओ बनवून घेत असावी, कारण हे व्हिडीओ तिच्याच लॅपटॉपमधले असल्याचं सांगण्यात आलं. (Pune BJP Corporator Dhanraj Ghogare allegedly steal Pooja Chavan Laptop)

संजय राठोड यांचा राजीनामा 

संजय राठोड यांनी अधिवेशनाच्या आधी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटलांची मागणी

पोलिसांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्याची तपासणी करावी. त्यामधून या प्रकरणाचे बरेच धागेदोरे हाती लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर आता भाजप नगरसेवकानेच लॅपटॉप चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

नुकतेच पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषद सुरु असताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी मात्र हसून थेट पत्रकार परिषदेतूनच काढता पाय घेतला होता. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती

VIDEO: शांताबाई खरंच पूजा चव्हाणची आजी आहे का? पूजाच्या आत्महत्येनंतर आता नात्यातील फ्रॉड?

(Pune BJP Corporator Dhanraj Ghogare allegedly steal Pooja Chavan Laptop)