पोलिसांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप स्कॅन करावा; बऱ्याच गोष्टी बाहेर येतील: चंद्रकांत पाटील

या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लक्ष घालावे. त्यांनीच पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. | Chandrakant Patil

पोलिसांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप स्कॅन करावा; बऱ्याच गोष्टी बाहेर येतील: चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 10:42 PM

पुणे: पोलिसांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्याची तपासणी करावी. त्यामधून याप्रकरणाचे बरेच धागेदोरे हाती लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. (BJP leader Chandrakant Patil on Pooja Chavan suicide case)

ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारने पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हटले. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लक्ष घालावे. त्यांनीच पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. आतापर्यंत या प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लीप्स समोर आल्या आहेत त्याआधारे पोलिसांनी सखोल चौकशी करावी. पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही. त्याची तपासणी केल्यास बरीच माहिती समोर येईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानते, मग उद्धव ठाकरेंच्या राज्यात काय चाललंय?

महाविकासआघाडी सरकारमध्ये चाललंत तरी काय? ड्रग्ज प्रकरणात यांच्या नातेवाईकांचे नाव येते. यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. ते मंत्री संबंधित महिलेशी संबंध असल्याची कबुलीही देतात. त्यानंतर ही महिला आपल्या दोन मुलांना कोंडून ठेवल्याचा आरोप करते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात. मग त्यांच्या राज्यात हे काय सुरु आहे. त्यांच्या राज्यात महिलाही सुरक्षित नाहीत. महाराजांच्या काळात महिलांना किती महत्त्वाचं स्थान होतं, हे लहान मुलगाही सांगेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

संजय राठोड यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टरबाजी

संजय राठोड यांच्याविरोधात भाजपचे नेते आक्रमक झाल्यानंतर यवतमाळमध्ये राठोड समर्थकांकडून त्यांचे समर्थन करण्यात येत आहे. त्यासाठी राठोड समर्थक सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहेत. यापैकी एक फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. जिसकी कामयाबी रोकी नही जा सकती, उसकी बदनामी शुरु की जाती है, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी बहिणही सरसावली, इन्स्टावर भावूक पोस्ट, माझी बहिण वाघिण होती

(BJP leader Chandrakant Patil on Pooja Chavan suicide case)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.