AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आश्चर्य वाटेल अशी योजना…; मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

Chandrakant Patil on Free Education for Girls : मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे. तसंच पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्ज सापल्याच्या प्रकरणावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. चंद्रका पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आश्चर्य वाटेल अशी योजना...; मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Jun 26, 2024 | 12:20 PM
Share

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यापासून मी किंवा सरकार मागे गेलेलो नाही. राज्यातली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे मुंबईत आज संध्याकाळपर्यंत तरी किमान किंवा दोन-तीन दिवस सुद्धा पदवीधर निवडणुकांमुळे आचारसंहिता आहे. हा निकालानंतर ही आचारसंहिता संपेल. मग याबाबत मुंबईमध्ये बसून निर्णय घेतला जाईल. आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा अनेक योजना आगामी काळात येतील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पुण्यातील काही पब आणि बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. पब, बारची झाडाझडती सुरू केली आहे. खूप विचारपूर्वक आवाहन करतो. प्रमाण वाढले, चिंता वाढली नक्की पण 70 लाख जनतेचं शहर गेलं कामातून अश्या प्रकारची प्रतिमा तयार होत आहे. याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. सगळ्यात चांगले शिक्षण संस्था पुण्यात आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. अशा घटना घडणं योग्य नाही, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

इंडस्ट्री, वैद्यकीय सुविधा इथे जास्त आहे. प्रचंड विकसित होणाऱ्या जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या देशातील 8 व मोठ शहर भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मानला जातो. व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेलं शहर अस प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे. प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, घटना घडल्यावर किंवा तात्पुरती कारवाई न करता. दक्षता बदकामध्ये नागरिकांचा सहभाग करून घेतला पाहिजे. संपूर्ण पुणेकरांनी सर्व बार पब 2-3 दिवस बंद केले पाहिजे. नियमावली तयार केली पाहिजे. नियमावलीची अंमलबजावणी केली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाणीप्रश्नावर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

राज्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की आपल्या जिल्ह्यामध्ये जुलै च्या शेवटपर्यंत किमान पिण्याचे पाणी शिल्लक ठेवून काय करायचं आहे ते करा. मी कठोरपणे शिव्या खाऊन उजनीच्या धरणाचं नियोजन केलं. म्हणून मी समाधानी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाला नाही. अनेकांनी मला शिव्या घातल्या. उजनी मायनसमध्ये सुद्धा किती जाऊ द्यायची. उजनी परिसरामध्ये गेल्या काही दिवसा न आधी पाऊस झाला की उजनीच पाणी हे सात टीएमसीने वाढलं. जसजसा पाऊस धरण क्षेत्रात पडेल तसतसा हा पाणी प्रश्न सुटेल, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.