Pune Lockdown Update | पुण्यात काय चालू काय काय बंद राहणार? आढावा बैठकीत मोठा निर्णय

आगामी सात दिवसांमध्ये कोणत्या सुविधा सुरु राहणार आहेत. कोणत्या सुविधा बंद राहतील याविषयी राव यांनी माहिती दिली. (Pune Corona lockdown update Sourabh Rao )

Pune Lockdown Update | पुण्यात काय चालू काय काय बंद राहणार? आढावा बैठकीत मोठा निर्णय
अजित पवार सौरभ राव

पुणे: पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona lockdown update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. आगामी सात दिवसांमध्ये कोणत्या सुविधा सुरु राहणार आहेत. कोणत्या सुविधा बंद राहतील याविषयी राव यांनी माहिती दिली. (Pune Corona lockdown update Sourabh Rao gave information which services closed and which services are continue for next seven days).

पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

पुण्यात काय बंद?

पुण्यामध्ये सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहेत. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळं 7 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   PMPML बससेवा 7 दिवस बंद मात्र केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील. पुणे जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारही बंद राहणार आहेत.  कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम  घेता येणार नाहीत. संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी  असेल आणि दिवसा जमावबंदी लागू करण्यात येणार आहे.  शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.


काय सुरु राहणार 

पुणे जिल्ह्यामध्ये  लग्न, आणि अंत्यसंस्कार  कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीला केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी राहील. लग्न सोहळ्याला 50 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. हॉटेल आणि  मात्र पार्सल सेवा सुरु राहील.  जिम पुढील सात दिवस सुरु राहणार आहेत. दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत.

पुण्याची परिस्थिती गंभीर

सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”. बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या: 

Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री आज रात्री संवाद साधणार

(Pune Corona lockdown update Sourabh Rao gave information which services closed and which services are continue for next seven days).

Published On - 1:46 pm, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI