Pune Corona Update : जिल्ह्यात उद्यापासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’, अजित पवारांच्या प्रशासनाला सक्त सूचना

पुण्यात कोरोनाचा धोका वाढल्याने खबरदारी घेण्यात येत असून, उद्यापासून तुमचे जर लसीकरण झाले नसेल तर तुम्हाला जिल्ह्यात एन्ट्री मिळणार नाही. तसेच  मास्क न घातल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई होणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

Pune Corona Update : जिल्ह्यात उद्यापासून 'नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री', अजित पवारांच्या  प्रशासनाला सक्त सूचना
AJIT PAWAR
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 7:14 PM

पुणे :  राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील धुमाकूळ घातला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्यात कोरोनाचा धोका वाढल्याने खबरदारी घेण्यात येत असून, उद्यापासून तुमचे जर लसीकरण झाले नसेल तर तुम्हाला जिल्ह्यात एन्ट्री मिळणार नाही. तसेच  मास्क न घातल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई होणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार? 

पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर रस्त्यावर थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील आजची (4 जानेवारी) कोरोना स्थिती

दिवसभरात 1 हजार 104 नवे रुग्ण दिवसभरात 151 रुग्णांना डिस्चार्ज पुणे शहरातील एका रुग्णाचा मृत्यू सध्या 89 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू पुण्यातील एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 5 लाख 12 हजार 689 पुण्यातील सक्रीय रुग्णसंथ्या – 3 हजार 790 पुण्यात एकूण मृत्यू – 9 हजार 119

संबंधित बातम्या

Pune Corona Update : पुण्यात 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद, अजितदादांकडून निर्णय जाहीर; नियम पाळण्याचं आवाहन

Pune Corona Update : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील 1ली ते 9वी पर्यंतचा शाळा उद्यापासून बंद, नवी नियमावली काय?

Coronavirus: तोपर्यंत लॉकडाऊनचा विचार नाही, राजेश टोपेंनी दिला मोठा दिलासा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.