AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी चोरली झाडे… कुणी पाहिली घडी? कोणी दाखवली ED पण…; राजेश टोपे यांची जाहीर सभेत शेरोशायरी

Rajesh Tope on Maharashtra Politics and Baramati Loksabha Election 2024 : पुण्यातील दौंड तालुक्यात आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. यावेळी त्यांनी शेरोशायरी केली. राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? महाविकास आघाडीच्या सभेला कोण-कोण उपस्थित आहे? वाचा सविस्तर...

कुणी चोरली झाडे... कुणी पाहिली घडी? कोणी दाखवली ED पण...; राजेश टोपे यांची जाहीर सभेत शेरोशायरी
| Updated on: May 04, 2024 | 6:00 PM
Share

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, राजेश टोपे, रोहित पवार, भूषणसिंह होळकर उपस्थित आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी या सभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी शेरोशायकी केल्याचं पाहायला मिळालं. “कुणी चोरली झाडे… कुणी पाहिली घडी? कोणी दाखवली ED पण जनतेच्या मनात फक्त महाविकास आघाडी”, असं राजेश टोपे म्हणाले.

दौंडकरांना काय आवाहन?

मी जालन्यातून मुद्दाम प्रचारासाठी आलो आहोत. आम्ही जो एक्ससिट पोल घेतला आहे. त्यावरून विदर्भ आणि मराठववाड्यात एक दोन सीट्स सोडल्या. तर सगळीकडे महाविकास अघडीचे उमेदवार निवडून येतील. सुप्रियाताईंनी आपला पक्ष वाढवण्यासाठी गल्लीत प्रचार केला. पक्ष वाढवला. मी भाऊ म्हणून तुम्हाला विंनती करतो की, परत निवडून द्या. त्या केवळ खासदार म्हणून राहिल्या आहेत. ताईंचं कर्तृत्व मोठं आहे. तुम्हाला आम्हाला ताईचा सार्थ अभिमान असला पाहिजे. म्हणून आपण ताईला निवडून दिले पाहिजे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोना काळात राज्याची सेवा शरद पवारसाहेबांनी केली. पवारसाहेब घराबाहेर पडून राज्यात फिरत होते. काम करत होते. माझं खूप कौतुक सुप्रियाताईंनी केलं. जर मानलेल्या भावंचं कौतुक त्या एवढं करत असतील, तर आपल्या भावाचं त्यांना किती कौतुक असेल?, असं म्हणत राजेश टोपे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर भाष्य केलं.

नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात

आपली बाजू नैतिक आहे. धर्माला धरून आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. आपलं स्वतंत्र धोक्यात आली आहे. लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे. नरेंद्र मोदींची गॅरंटी… आता विश्वास ठेवायला काहीच उरलं नाही. सगळी आश्वासन फोल ठरली आहेत. महागाई बेरोजगारि काहीच कमी झाली नाही. नरेंद्र मोदींनी शरद पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हटलं. हे दौंडकर सहन करणार का?, असा सवाल राजेश टोपे यांनी विचारला.

सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.