Chikungunya : चिकुनगुन्यात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर; काय म्हटलं महापालिकेनं? वाचा सविस्तर…

चिकुनगुन्या हा एक तापाचा आजार आहे. हा ताप साधारण तीन ते चार दिवस असतो. यात रुग्णाला ताप येतो तर थंडी वाजते. सोबतच डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, अंगदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Chikungunya : चिकुनगुन्यात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर; काय म्हटलं महापालिकेनं? वाचा सविस्तर...
Image Credit source: Wiki
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:35 PM

पुणे : राज्यात चिकुनगुन्याचे (Chikungunya) सर्वात जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. पुणे जिल्ह्यात जून अखेरीस चिकुनगुनियाचे 112 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. साथीच्या रोगविज्ञान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. पुण्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये 52, सातारा 24, सांगली 17, ठाणे, अकोला आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी 12, पालघरमध्ये 10, तर यवतमाळमध्ये चिकुनगुन्याचे 6, नाशिकमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिका (Pune municipal corporation) हद्दीत जून अखेरपर्यंत चिकुनगुन्याच्या 73 केसेस नोंदवल्या गेल्या. चिकुनगुन्याचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती (Aedes aegypti) आणि एडिस अल्बोपिक्टस, संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे व्यक्तीमध्ये पसरतो. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तापासह सांधेदुखी यामुळे रुग्ण या आजारामध्ये त्रस्त असतो, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

धूर फवारण्यासह विविध उपाययोजना

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले, की जूनमध्ये 11 रुग्ण आढळले आहेत. या वर्षी पुणे महापालिकेच्या हद्दीत चिकुनगुन्याच्या 72 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. या डासांची उत्पत्ती ज्याठिकाणी होते, त्याठिकाणच्या गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक संकुल तपासण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या आधीच धूर फवारण्याचे काम सुरू झाले होते, असे डॉ. वावरे म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत चिकुनगुन्याचे 450 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात 342 प्रकरणे नोंदवली गेली होती.

तपासणी करण्याचे आवाहन

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, केवळ जूनमध्ये चिकुनगुन्याचे 11 रुग्ण आढळले आहेत. एप्रिलमध्ये चिकुनगुन्यासाठी पॉझिटिव्ह चाचणी केलेल्या सर्वाधिक 33 केसेसची नोंद झाली. गेल्या वर्षी, सप्टेंबर अखेरपर्यंत, पुणे महापालिका हद्दीत चिकुनगुन्याची 180 केसेस नोंदवल्या गेल्या. लक्षणे आढळल्यास तपासणी आणि चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

लक्षणे काय?

चिकुनगुन्या हा एक तापाचा आजार आहे. हा ताप साधारण तीन ते चार दिवस असतो. यात रुग्णाला ताप येतो तर थंडी वाजते. सोबतच डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, अंगदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात. तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी होय. ही तीव्र सांधेदुखी असते. हातापायाचे सांधे दुखू शकतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.