AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॅक्ट चेक : राज्य सरकारच्या सरल पोर्टलवर फक्त ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद?

सरल पोर्टल संबंधित वादावर पुण्याचे शिक्षण विभाग आयुक्त विशाल सोळंखी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे (Pune Education commissioner on Saral Portal Controversy).

फॅक्ट चेक : राज्य सरकारच्या सरल पोर्टलवर फक्त ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद?
| Updated on: Dec 18, 2020 | 7:08 PM
Share

पुणे : सरल पोर्टलवर फक्त ब्राह्मण जातीचा उल्लेख का? असा सवाल ब्राह्मण सेवा संघाने केला आहे. “सरल पोर्टलवर ब्राह्मण किंवा इतर असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. पोर्टलवरील या बदलांमुळे सरकारकडून भेदभाव केला जात आहे”, असा आरोप ब्राह्मण सेवा संघाकडून करण्यात आला. या आरोपांवर पुण्याचे शिक्षण विभाग आयुक्त विशाल सोळंखी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे (Pune Education commissioner on Saral Portal Controversy).

राज्य सरकारचं सरल नावाचं पोर्टल आहे. या पोर्टलवर शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची माहिती नोंदवली जाते. शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि लाभाच्या योजनांसाठी विद्यार्थ्यांची जातनिहाय सांख्यिकी माहिती आवश्यक असल्याने सरल पोर्टलवर याबाबतच्या माहितीची नोंद केली जाते. मात्र, या पोर्टलवरुन ब्राह्मण सेवा संघाने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

“पूर्वी याबाबतची माहिती भरताना केवळ जात हा पर्याय होता. जातीच्या पुढच्या रकान्यात विद्यार्थ्यांची जात लिहिली जायची. मात्र, आता फक्त ब्राह्मण आणि इतर अशा स्वरुपाचे दोन पर्याय दिसतात. त्यामुळे ब्राह्मण ही एकच जात आहे का? सरकारचा यामागील हेतू अस्पष्ट आहे. सरकारला ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर असा वाद निर्माण करायचा आहे का? याप्रकरणी तात्काळ कारवाई करुन पूर्वीसारखे जातीच्या पर्यायासमोर रकानं ठेवावं”, अशी मागणी ब्राह्मण सेवा संघाने केली होती. याबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनादेखील पत्र लिहिले. त्यांच्या पत्रानंतर पुण्याचे शिक्षण विभागाचे आयुक्तांनी प्रसिद्धपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं.

“सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची संवर्ग आणि जातनिहाय माहिती घेताना केवळ ब्राह्मण आणि इतर अशी माहिती घेतली जात असल्याची बातमी अर्धसत्य आहे. विद्यार्थ्यांची माहिती अद्याययावत करताना धर्म निवड केल्यानंतर संवर्ग निवडण्याची तरतूद उपलब्ध आहे. उदा. विद्यार्थ्यांचा धर्म हिंदू निवडल्यास संवर्ग General, SC, ST, OBC, VJA, SBC, NT B, NT C, NT D, Other, SEBC, Not Known निवडण्यासाठी याप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. सदर संवर्ग निवडल्यानंतर संबंधित संवर्गातील प्रमुख जाती, जात निवडताना उपलब्ध करून दिल्या आहेत”, असं आयु्क्तांनी सांगितलं.

“याप्रमाणे उदा. धर्म : हिंदू , संवर्ग : खुला असे निवडल्यानंतर जात या पर्यायामध्ये राज्यात हिंदू धर्मातील सद्यस्थितीत खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण अथवा इतर असा पर्याय येतो. यापूर्वी इथे ब्राम्हण, मराठा आणि इतर असा पर्याय उपलब्ध होता. मात्र मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी SEBC हा प्रवर्ग निर्माण करण्यात आल्याने सद्यस्थितीत हिंदू, खुला यामध्ये ब्राम्हण आणि इतर असा पर्याय उपलब्ध आहे”, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

“इतर संवर्गाच्या सुद्धा प्रमुख जाती या विद्यार्थ्यांची जात नोंदविताना उपलब्ध करून दिल्या आहेत. याप्रमाणे धर्म, संवर्ग निवडल्यानंतर सुमारे 1202 प्रमुख जाती विद्यार्थ्यांची जात नोंदविण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहे. यामुळे उपरोक्त बातमी ही अर्धवट माहितीवर आधारित आहे”, असं स्पष्टीकरण आयुक्तांनी दिलं (Pune Education commissioner on Saral Portal Controversy).

हेही वाचा : Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.