कोरोनाच्या लक्षणांमध्ये हवामानानुसार बदल, पुण्याच्या एका वैज्ञानिकाचा दावा

जून-जुलै महिन्यात सर्वत्र पसरलेला कोरोना आता विविध राज्यात वेगवेगळ्या रुपात आहे, असं तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले (Pune expert says corona virus type has changed since june).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:33 PM, 5 Dec 2020
अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या 18 टक्के लोकांनी फोटोफोबिया किंवा प्रकाशात त्रास होत असल्याचं सांगितलं आहे.

पुणे : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सचे (NCCS) वैज्ञानिक डॉक्टर योगेश शौचे यांनी कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. NCCS च्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवसच्या वेबिनारमध्ये ते बोलते होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या बदलत्या रुप बद्दल चर्चा केली. जून-जुलै महिन्यात सर्वत्र पसरलेला कोरोना आता विविध राज्यात वेगवेगळ्या रुपात आहे, असं डॉक्टर शौचे म्हणाले (Pune expert says corona virus type has changed since june).

“माझ्या अभ्यासानुसार जून आणि जुलै महिन्यात नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचे वेगवेगळे प्रकार आढळले होते. कोरोना आता वेगवेगळ्या रुपात प्रभावित करु शकतो. वातावरणानुसार कोरोनाचे लक्षणे बदलत आहेत”, असा दावा डॉक्टर योगेश शौचे यांनी केला.

“जगभरतील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही दुरसी लाट किती गंभीर स्वरुपाची आहे याचा अभ्यास सुरु आहे. दरम्यान, कोरोनावर कशाप्रकारे उपचार करावा याबाबत आधीपेक्षा जास्त माहिती आता आपल्याकडे आहे”, असं डॉक्टर शौचे यांनी सांगितलं.

“विषाणूंमध्ये परिवर्तन होतात. वातावरणानुसार त्यांच्यात वेगवेगळे बदल होत असतात. जगभरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. इटली, जर्मनी आणि रशियात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे”, असं योगेश शौचे म्हणाले (Pune expert says corona virus type has changed since june).

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 96 लाखांच्या पार

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 96 लाखांच्या पार गेला आहे. देशात आतापर्यंत 96 लाख 30 हजार 893 कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी 1 लाख 40 हजार 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 90 लाख 85 हजार 514 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर लस शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक लसी अंतिम टप्प्यावर आहेत. कोरोनावर लस उपलब्ध झाली तर जगाला मोठा दिलासा मिळेल.

संबंधित बातमी : Corona | मॉडर्ना वॅक्सीन मानवी शरीरात 3 महिन्यात बनवू शकते अँटीबॉडी, रिसर्चमध्ये दावा