Pune Gold Rate | पुण्यात सोनं 50 हजारांवर स्थिर, चांदी 200 रुपयांनी घसरली, काय आहे आजचा दर?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 11:00 AM

चार दिवसांपूर्वी 50 हजारांचा टप्पा पार केलेल्या सोन्याच्या दराने आपली घौडदौड कायम ठेवली आहे. पुण्यात आजही सोनं प्रतितोळा 50 हजारांच्या घरात स्थिर आहे.

Pune Gold Rate | पुण्यात सोनं 50 हजारांवर स्थिर, चांदी 200 रुपयांनी घसरली, काय आहे आजचा दर?
सोन्याचा दर

पुणे : चार दिवसांपूर्वी 50 हजारांचा टप्पा पार केलेल्या सोन्याच्या दराने आपली घौडदौड कायम ठेवली आहे. पुण्यात आजही सोनं प्रतितोळा 50 हजारांच्या घरात स्थिर आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर पुण्यात 50 हजार 160 रुपये आहे. गेले दोन-तीन दिवस सोन्याच्या दरात 150-300 रुपयांदरम्यान चढ-उतार पहायला मिळतोय, पण सोन्यानं आपली झळाळी 50 हजारांच्या वर कायम ठेवली आहे. (Gold price is stable at Rs 50,000 while silver rate has declined today in pune)

22 कॅरेट सोन्याचा दरही आज थोडासा वधारला आहे. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 45 हजार 900 रुपयांवर गेला आहे.

चांदी पुन्हा घसरली

गेल्या आठवड्यात चांदीच्या दरातही सातत्यानं चढ-उतार पहायला मिळाला. कधी एका दिवसात चांदी 800 रुपयांनी वाढली तर कधी 600 रुपयांनी कमी झाली. आजही चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे. पुण्यात आज एक किलो चांदीचा दर 63 हजार 600 रुपयांवर आला आहे. काल हा दर 63 हजार 800 रुपये होता.

आजपासून Sovereign Gold Bond योजना सुरू

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी Sovereign Gold Bond सहावी योजना सुरू केलीय. यासाठी आजपासून सब्सक्रिप्शन सुरू करण्यात आलं असून ते 3 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सोन्याच्या बाँडसाठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करण्यासाठी 50 रुपये प्रति ग्रॅम स्वतंत्रपणे उपलब्ध असेल. भारत सरकारच्या वतीने बाँड जारी करते. या बाँडची विक्री बँका (लहान वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजेस नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि BSE द्वारे केली जाते.

सॉवरेन गोल्ड पेपर गोल्ड म्हणजे काय?

सॉवरेन गोल्ड बाँड हे एक प्रकारे पेपर गोल्ड आहे, कारण तुम्हाला कागदावर लिहून सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते. बाँडची किंमत सोन्याच्या वजनाच्या दृष्टीने ठरवली जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास बाँडची किंमत बाजारात फिजिकल गोल्डची किंमत सारखीच असते. हा दर प्रति ग्रॅम सोन्याच्या किमतीनुसार निश्चित केला जातो. जर सोन्याच्या ग्रॅमच्या संख्येइतके बाँड असेल तर ते विकल्यास सोन्याइतकी किंमत मिळेल.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचे सहा प्रमुख फायदे

> निश्चित परतावा – सॉवरेन गोल्ड बाँडच्या गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.5% दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध असेल. >> कॅपिटल गेन्स टॅक्समधून सूट : रिडीम्पशनवर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स लावला जाणार नाही. >> कर्ज सुविधा : कर्जासाठी कोलेटरल म्हणून वापरता येते. >> स्टोरेजची समस्या नाही : सुरक्षित, भौतिक सोन्यासारखी स्टोरेज समस्या नाही. >> तरलता (लिक्विडिटी) : एक्सचेंजवर व्यापार करू शकतो. >> जीएसटीमधून सूट, शुल्क आकारणे : फिजिकल गोल्डप्रमाणे जीएसटी नाही आणि शुल्क आकारणे.

इतर बातम्या :

Post Office च्या 9 जबरदस्त योजना, कोणत्या योजनेत किती दिवसात पैसे दुप्पट होणार?

15 हजार रुपये वाचवण्यावर दरमहा 1 लाख पेन्शन, जाणून घ्या खास सरकारी योजना

रेशन कार्ड तयार करायचेय, नियम बदलले, आता ‘या’ कागदपत्रांची गरज लागणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI