AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पालकमंत्रीपदासाठी अजितदादांची दादागिरी, भाजपला बसणार धक्का

Ajit Pawar and Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांना हवे असणारे अर्थ खातेही मिळाले. आता पुण्यातील पालकमंत्रीपदही त्यांच्यांकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे पालकमंत्रीपदासाठी अजितदादांची दादागिरी, भाजपला बसणार धक्का
Image Credit source: tv9
Updated on: Jul 15, 2023 | 5:20 PM
Share

योगेश बोरसे, पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नऊ जण मंत्री झाले. यानंतर बुधवारी अजित पवार यांना हवे असलेले अर्थ अन् नियोजन खातेही मिळाले. शिवसेनेचा दबाव झुगारुन अजित पवार अर्थमंत्री झाले. आता त्यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुणे भाजपसाठी हा धक्का आहे.

अजित पवार यांना का हवे पुणे

अजित पवार आणि शरद पवार दोन्ही नेते पुणे जिल्ह्यातील आहेत. शरद पवार गटातून अजित पवार वेगळे झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्यापेक्षा आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुण्याकडे असते. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात होऊ शकतात. त्यावेळी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. पालकमंत्री पद ज्याच्याकडे असेल त्या पक्षांची अनेक कामे होत असतात. यामुळे अर्थ खात्यानंतर पुणे जिल्ह्यातील पालकमंत्रीपदासाठी अजितदादांची दादागिरी चालणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपला बसणार धक्का

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेल्यास स्थानिक भाजपला तो धक्का बसणार आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते अजित पवार यांना पालकमंत्री करण्यास विरोध करत आहेत. कारण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अन् भाजप दोन्ही पक्ष प्रभावी आहेत. परंतु भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या पुण्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवावे, असा आग्रह स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे. भाजपकडून राष्ट्रवादीकडे हे पद गेल्यास भाजप बॅकफूटवर जाईल, अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादीला मिळणार दहा मंत्रीपद

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 10 पालकमंत्री पद मिळणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यावर राज्यातील पालकमंत्री बदलले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यात राष्ट्रवादीच बाजी मारणार आहे.

त्यानं तिला एकांतात घेरलं, मारली मिठी; ज्योतिषानं जे केलं ते संतापजनक
त्यानं तिला एकांतात घेरलं, मारली मिठी; ज्योतिषानं जे केलं ते संतापजनक.
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्...
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं.
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका.
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले.
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?.
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?.
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार.
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्...
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्....