AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वराज्यजननी जिजामातांनी पुरातून सुटका केली, अतिक्रमण करुन पुणेकरांनी जीव धोक्यात घातला, आंबिल ओढ्याचं काय काय झालं?

Pune Ambil Odha history : पुण्यातही अशीच घटना दोन वर्षापूर्वी झाली होती आणि विशेष म्हणजे आज ज्या आंबिल ओढ्यावरुन वाद झाला आहे, तोच ओढा त्यावेळेसही घटनेच्या मुख्य केंद्रस्थानी होता.

स्वराज्यजननी जिजामातांनी पुरातून सुटका केली, अतिक्रमण करुन पुणेकरांनी जीव धोक्यात घातला, आंबिल ओढ्याचं काय काय झालं?
Pune Ambil Odha
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 1:26 PM
Share

पुणे : फक्त पुणेच नाही तर देशातल्या प्रमुख शहरांमध्ये थोडासाही पाऊस झाला की पाणी घरांच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत चढतंय. हे गुजरातमध्ये दिसलं, राजस्थानमध्ये दिसलं, हैदराबादमध्येही घडलेलं पाहिलं. गाड्या बघता बघता तरंगायला लागतात. अलिकडेच मुंबईत एक कार काही सेकंदात जमीनीत गायब झाली. हे सगळं का होत असेल? अर्थातच त्याला एकमेव कारण सांगितलं जातं अतिक्रमण. हे अतिक्रमण कधी लोक करतात, कधी बिल्डर करतो कधी कधी प्रशासकीय यंत्रणा करतात. म्हणजे नैसर्गिक प्रवाह बदलला जातो, कधी नैसर्गिक नदी, नाले बुजवून भराव टाकला जातो. त्यावर इमारत उभी राहते. कधी आणखी काही. परिणाम गाड्या, घरं, इमारती अगदी मध्यम स्वरुपाच्या पावसानेही जमीनदोस्त होतात. पुण्यातही अशीच घटना दोन वर्षापूर्वी झाली होती आणि विशेष म्हणजे आज ज्या आंबिल ओढ्यावरुन वाद झाला आहे, तोच ओढा त्यावेळेसही घटनेच्या मुख्य केंद्रस्थानी होता. (Pune history of ambil odha when Swarajyajanni Jijamata rescued from the flood)

जेव्हा आंबिल ओढ्यावर 26 जणांचा बळी गेला

आंबिल ओढ्यावर फक्त लोकांनीच अतिक्रमण केलंय असं नाही तर महानगरपालिकेनेही काही ठिकाणी भराव टाकून गार्डन वगैरेंचा घाट घातल्याचं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. त्याचा परिणाम 2019 साली अचानक आलेल्या पावसात (Pune Flash floods) भोगावे लागले. 25 सप्टेंबरला दक्षिण पुण्यात जोरदार पाऊस झाला. कात्रज तलाव भरला. त्याचं पाणी आंबिल ओढ्यातून वाहू लागलं. बघता बघता पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडला. तलावाच्या शेजारच्या लेक टाऊन सोसायटीची भिंत पडली. पाणी आता शिरलं. नंतर पद्मावतीच्या विवेकानंद पुतळ्याजवळ आंबिल ओढ्याचीच संरक्षक भिंत कोसळली. शेजारच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. त्याच वेळेस गुरुराज सोसायटीत तर पाण्यानं दुसरा मजला गाठला. तावरे कॉलनी, बागूल उद्यान, लक्ष्मी नगर भागातही पाण्यानं हाहा:कार माजवला. दांडेकर पूल भागातल्या काठावरच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. घरांचं प्रचंड नुकसान झालं. काही जण कायमचे बेघर झाले. ह्या सगळ्या घटनांमध्ये त्यादिवशी 26 जणांना जीव गमवावा लागला.

आंबिल ओढ्याचा इतिहास

आंबिल ओढ्याची सुरुवात ही कात्रज तलावापासून होते. पेशव्यांच्या काळात आंबिल ओढा ही पुण्याची पश्चिम सीमा समजली जायची. कात्रजहून वाहत येणारा आंबिल ओढा हा पर्वतीच्या पायथ्यावरून पुणे गावात जायचा. पावसाळ्यात पूर यायचा. गावात नुकसान व्हायचं. एका पहाणी दौऱ्यात त्या वेळेस जिजाबाईंनी या ओढ्यावर धरण बांधायला सांगितले. धरण बांधलं. पावसाळ्यात होणारा पुराचा त्रास कमी झाला. जिजाबाईंच्या सूचनेनुसारनुसारच पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या दांडेकर पुलाच्या पश्चिमेला दिसणारे एक छोटेसे धरण बांधले. त्याचा आकार हा बेलाच्या पानासारखा आहे. त्यामुळे त्याचं नाव पडलं `बेल धरण`. सध्या आंबिल ओढ्याच्या काठावर कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, पर्वती, आंबिल ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत, राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर वसलेत. आंबिल ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस मुठा नदीला मिळतो.

कात्रज टेकडी ते आंबिल ओढा

पुण्यातील कात्रजच्या टेकडीवरून पावसाचं पाणी आंबिल ओढ्यातून पुण्यात येतं. तिथून हा ओढा दांडेकर पुलालगत मुठा नदीला मिळतो.

सध्याच्या पुण्यातील कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकार नगर , दत्तवाडी हे परिसर या आंबील ओढ्याच्या दोन्ही बाजूंना वसले आहेत. तीन वर्षांपूर्वी कात्रजच्या टेकडीवर ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यावेळी या सगळ्या परिसरात दाणादाण उडाली होती. अनेकांचे संसार रस्त्यावर आले तर जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आंबिल ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहावर गेल्या अनेक वर्षांपासून झालेली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली.

आजची कारवाई हा त्याचाच एक भाग आहे. पण हा आंबिल ओढा याच्या आधीही पुण्यासाठी विध्वंसक ठरला आहे. आंबिल ओढ्याच्या प्रवाहाला आवर घालण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न केला तो जिजाबाईंनी. पुण्याचा कारभार पाहताना जिजाबाईंनी आंबिल ओढ्यावर पर्वतीच्या पायथ्याला एक छोटं धरण बांधलं जे बेल धरण म्हणून ओळखलं गेलं. आजही या धरणाचे अवशेष पहायला मिळतात. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी 1749 साली पुण्याला पाणी पुरवठा करण्यासाठी कात्रजला दोन तलाव बांधले आणि पाणी पुरवठ्याची स्वतंत्र यंत्रणा उभारुन पुण्यातील पेठांमधे आणि शनिवार वाड्यात पाणी आणलं. या पाणीपुरवठ्याच्या बोगद्यात अतिरिक्त होणारं पाणी आंबिल ओढ्यात सोडण्याची सोय करण्यात आली. मात्र तरीही आंबिल ओढ्याला पूर येऊन जीवितहानी होणं अधून मधून सुरुच राहिलं.

पुण्याचा कारभार नानासाहेब पेशवे पाहात असताना अचानक या ओढ्याला पूर येऊन चारशे लोक वाहून गेल्याची नोंद आहे. त्यानंतर आंबिल ओढ्याला आवर घालण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला आणि आताच्या सारसबागेजवळ एक तलाव बांधण्यात आला.

आंबिल ओढ्यावरील घरांचं पाडकाम 

पुण्यातील आंबिल ओढ्याचा (Ambil Odha) प्रश्न चिघळला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आहे. त्यासाठी आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

Ambil Odha Dispute Live Update | पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला, नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

Pune Ambil Odha : आंबिल ओढ्यात नेमका कुणाच्या आदेशावरुन JCB घुसला?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.