AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरात मोठी कारवाई, तब्बल 49 पब आणि बार सील

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणानंतर शहरामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून पुणयातील नियमबाह्य पब आणि बार आता सील करण्यात आलेत.

पुणे 'हिट अँड रन' प्रकरणानंतर शहरात मोठी कारवाई, तब्बल 49 पब आणि बार सील
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 25, 2024 | 6:17 PM
Share

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहेत. कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील 49 पब आणि बारवर कारवाई

कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बार वर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले असून ते बंद करून सील करण्यात आले आहे.याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.

ल्याणी नगर येथील अपघातानंतर जवळपास 49 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली आहे.या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 57 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षभरात 257 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.तसेच या कारवाई मध्ये 1 कोटी 12 लाख रुपयांच दंड देखील वसूल करण्यात आलं आहे, असं चरणसिंग राजपूत म्हणाले.

या कारवाई मध्ये पब आणि बार च्या वेळा, तसेच त्यांच्या प्रिमायसेस मध्ये काही बदल केला आहे का? तसेच रफटॉप बाबत आलेल्या तक्रारी, विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बार वर कारवाई करण्यात येत असून ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचं यावेळी चरणसिंग राजपूत म्हणाले.

दरम्यान, या अपघातामुळे कोरेगाव पार्क परिसरात असे अनेक क्लब असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. तर काही पब हे राजकारणातील नेत्यांच्या वरदहस्ताने सुरू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. कारण पबमालक हप्ता देत असल्याने त्यांना भीती राहिली नाही, अशी टीकाही उघडपणे काही नेत्यांनी केलीये. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क  विभागाने कारवाईचा धडाका लावल्याचं दिसत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी