AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Bomb: सात तासांचा टायमर…सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल… जिवंत बॉम्ब….रात्रभर पुण्यात घडलं काय?

Pune Bomb Hadapsar Super Specialist Hospital: पुण्यात रात्रभर बॉम्ब सदृश्य वस्तूने एकच खळबळ उडवून दिली. हडपसर परिसरातील एका नामांकित हॉस्पिटल परिसरात टायमर आणि स्फोटके आढळल्याने पोलिसांसह सर्वांची झोप उडाली.

Pune Bomb: सात तासांचा टायमर...सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल... जिवंत बॉम्ब....रात्रभर पुण्यात घडलं काय?
जिवंत बॉम्ब, टायमर आणि टायमिंग...Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 14, 2026 | 9:33 AM
Share

Pune Bomb Hadapsar Super Specialist Hospital: पुणे काल मध्यरात्री वेठीस धरल्या गेले. हडपसर परिसरातील कामधेनु इस्टेटमधील एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट खासगी रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तूने खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळला. टायमरसह स्फोटके लावण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले. तातडीने पोलिसांना ही माहिती देण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.

सात तासांचा टायमर, बॉम्ब नाट्यानं

संशयास्पद सर्किट आणि टायमर असलेली पांढऱ्या रंगाची वस्तू नागरिकांनी पाहिली. त्यांनी पोलिसांना लागलीच कळवले. या बॉम्बमध्ये सात तासांचा टायमर सेट केलेला होता. बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने दाखल झाले. टायमरवर उरलेला वेळ पाहून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ परिसरात नाकेबंदी केली. या घटनेमुळे रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी आणि आजूबाजूची रहिवाशी भीतीच्या सावटाखाली होते.

लो ग्रेड आयईडीचा वापर

टायमर लावलेला जिवंत बॉम्ब हा लो ग्रेड आयईडी असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटकं लावून त्याला सर्किट आणि टायमर लावल्याचे तपासात उघड झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही वस्तू ताब्यात घेतली. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन ती यशस्वीरित्या निकामी करण्यात आली. पण हा जिवंत बॉम्ब ठेवण्यामागे कुणाचा हात आहे, त्याने हे कृत्य का केले याचा पोलीस तपास घेत आहेत.

सीसीटीव्हीत ती व्यक्ती कैद

सीसीटीव्हीत जिवंत बॉम्ब ठेवणारी व्यक्ती कैद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही संशयित व्यक्ती एका इलेक्ट्रिक स्कूटरवरून आली होती. रस्त्यांवरील सीसीटीव्ही आधारे पोलीस आता त्याचा शोध घेत असल्याचे समजते. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. ही व्यक्ती ताब्यात आल्यानंतर या घटनेमागील सर्व बाबी समोर येतील. तपासासाठी पोलिसांची तीन पथकं स्थापन करण्यात आली आहेत. स्थानिक पोलीस, पुणे शहर गुन्हे शाखा पथक आणि एटीएस असे तीनही पथकं या घटनेचा तपास करत आहेत.  संशयीताला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी