VIDEO | पाडव्याला ट्रॅक्टर घेतला अन् त्याच्या खाली बापलेकाचा जीव गेला, जुन्नरमध्ये थरकाप उडवणारा अपघात

शेतीच्या मशागतीसाठी जात असताना ट्रॅक्टरचा अपघात होऊन पोलीस पित्यासह मुलाचाही करुण अंत झाला (Pune Junnar Father Son Tractor)

  • जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर
  • Published On - 9:48 AM, 19 Apr 2021
VIDEO | पाडव्याला ट्रॅक्टर घेतला अन् त्याच्या खाली बापलेकाचा जीव गेला, जुन्नरमध्ये थरकाप उडवणारा अपघात
जुन्नरमध्ये बापलेकाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू

जुन्नर : शेतीच्या मशागतीसाठी जाताना ट्रॅक्टरच्या अपघातात बापलेकाला जीव गमवावा लागला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याला घेतलेला नवाकोरा ट्रॅक्टरचा वडील आणि मुलासाठी काळ ठरला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. (Pune Junnar Accident Father Son killed as Tractor falls off)

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील राळेगण येथे हा अपघात घडला. शेतीच्या मशागतीसाठी जात असताना ट्रॅक्टरचा अपघात होऊन पोलीस पित्यासह मुलाचाही करुण अंत झाला. कल्याण येथील पोलीस ठाण्यामधे कार्यरत असलेले 56 वर्षीय सोपान उडे सुट्टी घेऊन गावाला आले होते. नुकताच गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला होता.

चढणीच्या वेळी ट्रॅक्टर शेतात कोसळला

ट्रॅक्टर चालक संदेश तळपे, सोपान उडे आणि त्यांचा 20 वर्षीय मुलगा तेजस शेतीच्या मशागतीसाठी शेतावर चालले होते. चढणीच्या रस्त्यावर अंदाज न आल्याने ट्रॅक्टर 20 फूट खोल असलेल्या बाजूच्या शेतात कोसळला. त्यामध्ये वडील-मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे राळेगणमध्ये शोककळा पसरली आहे.

पाहा व्हिडीओ :

लेकीच्या अंगावर ट्रक घातला

मुलगी व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्यातरी मुलाशी चॅटिंग करत असल्यामुळे एका निर्दयी बापाने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. या बापाने आपली मुलगी एका मुलाशी बोलते याचा राग धरत पोटच्या दोन्ही मुलींना ठार मारलं. मुलींना चालत्या ट्रकसमोर झोपवत या बापाने त्यांच्या अंगावर ट्रक घातला आहे. हा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील इंदोरी गावात घडलाय. आपल्या दोन मुलींचा जीव घेत या बापाने स्वत:लासुद्धा संपवलं आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे पुणे जिल्हा सुन्न झालाय.

भरत ज्ञानदेव भराटे याची एक मुलगी एका तरुणाशी व्हॉट्सअ‌ॅपवर चॅटिंग करायची. हा प्रकार समजल्यानंतर भरत भराटे याला राग अनावर झाला. भराटे याने थेट नंदिनी आणि तिला पाठिंबा देणारी दुसरी मुलगी वैष्णवी या दोघींना ट्रकखाली झोपवले. तसेच त्यांच्या अंगावरुन ट्रक घातला. या घटनेत या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. तसेच मुलींच्या अंगावर ट्रक घालून भरत फराटे यानेसुद्धा चालत्या ट्रकखाली उडी घेत आत्महत्या केली.

संबंधित बातम्या :

ज्या लेकीचं ट्रकवर नाव तिच्याच अंगावरुन ट्रक चालवला, दोन्ही मुलींना संपवणाऱ्या बापाचीही आत्महत्या, महाराष्ट्र हादरला

(Pune Junnar Accident Father Son killed as Tractor falls off)